ई-पासपोर्ट म्हणजे काय? आपल्या पासपोर्टपेक्षा किती वेगळा, अर्ज कसा करायचा? सोप्या शब्दात जाणून घ्या

सुरुवातीच्या टप्प्यात, नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, सुरत, रांची आणि दिल्ली येथे ई-पासपोर्टचे वितरण सुरू करण्यात आले आहे. २०२५ च्या मध्यापर्यंत देशातील सर्व पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये ते लागू केले जाईल.

What Is E Passport : भारत सरकारने ओळख आणि सुरक्षेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ई-पासपोर्ट सुरू केला आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्या पारंपारिक पासपोर्टमध्ये RFID चिप आणि PKI इन्फ्रास्ट्रक्चरसह अनेक सुरक्षा सुविधा जोडल्या गेल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, ई-पासपोर्ट योजना ही पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) व्हर्जन २.० अंतर्गत एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे. हा कार्यक्रम १ एप्रिल २०२४ पासून लागू झाला आहे.

सर्वप्रथम या शहरांना मिळणार ई-पासपोर्टचा

सुरुवातीच्या टप्प्यात, नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, सुरत, रांची आणि दिल्ली येथे ई-पासपोर्टचे वितरण सुरू करण्यात आले आहे. २०२५ च्या मध्यापर्यंत देशातील सर्व पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये ते लागू केले जाईल, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

ई-पासपोर्ट म्हणजे काय आणि खास वैशिष्ट्ये काय?

ई-पासपोर्ट हा एक आधुनिक डिजिटल पासपोर्ट आहे, ज्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) चिप आणि अँटेना बसवलेला असतो. यामुळे तो पारंपरिक पासपोर्टपेक्षा अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनतो.

हे तंत्रज्ञान कसे कार्य करते?

ई-पासपोर्टमध्ये पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर (PKI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान पासपोर्टमध्ये नोंदवलेल्या वैयक्तिक व बायोमेट्रिक माहितीची सुरक्षा आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते.

डेटा सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल

ई-पासपोर्टमध्ये वापरलेली आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली डेटा सुरक्षेला अधिक बळकट बनवते. यामुळे पासपोर्टमध्ये छेडछाड, बनावट पासपोर्ट बनवणे, फसवणूक करणे यांसारख्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे.

ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा?

ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पारंपरिक पासपोर्टसारखीच आहे, फक्त आता पासपोर्टमध्ये नवीन RFID चिप व PKI तंत्रज्ञान जोडले जाते.

  • पासपोर्ट सेवा पोर्टलवर नोंदणी करा
    passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. नवीन युजर असल्यास “Register Now” वर क्लिक करा आणि आपली माहिती भरा.
  • लॉगिन करून अर्ज भरा
    नोंदणी केल्यानंतर यूजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
    Apply for Fresh Passport / Reissue of Passport” हा पर्याय निवडा.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा
    तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, ओळखपत्रे आणि इतर तपशील भरावेत.
    फॉर्म सबमिट केल्यानंतर Appointment बुक करा.
  • फी भरा
    ऑनलाइनच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे फी भरा.
    सामान्य सेवा किंवा Tatkal सेवा निवडू शकता.
  • पासपोर्ट सेवा केंद्राल भेट द्या
    निवडलेल्या दिवशी आणि वेळेला पासपोर्ट सेवा केंद्राला आवश्यक मूळ कागदपत्रांसह जा.
    येथे बायोमेट्रिक वेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट चेकिंग होते.
  • पोलीस व्हेरिफिकेशन
    फॉर्म सबमिट झाल्यानंतर, तुमच्या पत्त्यावर पोलीस व्हेरिफिकेशन होईल.
  • ई-पासपोर्ट मिळवणे
    सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा ई-पासपोर्ट तयार होऊन पोस्टाद्वारे तुमच्या पत्त्यावर पाठवला जाईल.
    ई-पासपोर्टच्या कव्हरवर सोनेरी चिपचा लोगो असतो, ज्यामध्ये तुमचा डेटा असतो.

About Author

Rohit Jernavare

Other Latest News