नवी दिल्ली: आज देशभर नेट-युजी परीक्षा पार पडत आहे. यामध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी देखील विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय परीक्षा असं संबोधलं जातं. ही परीक्षा आज होत आहे. यंदा बहुसंख्य परीक्षा केंद्रे शासकीय विभागांत अथवा कॉलेजांत ठेवण्यात आली आहेत.
गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष उपाय
आज 2 ते 5 वाजता दुपारच्या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात कायदेशीर कारवाईसह संबंधितास तीन वर्षे परिक्षेस बसण्यास बंदी अशा प्रकारच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. नीट युजी परीक्षेत 2024 साली झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे यंदा प्रचंड काळजी घेतली जात आहे. नियमही अधिक कडक करण्यात आले आहेत.यंदा बहुतांश परीक्षा केंद्रे सरकारी शाळा, अनुदानित शाळा अथवा कॉलेजमध्ये देण्यात आले आहेत.

बंदीसह कायदेशीर कारवाई
गैरप्रकार केल्याचे उघड झाल्यास संबंधितांवर तीन वर्षांसाठी बंदी घातली जाईल. शिवाय अयोग्य साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालणारा कायदा-2024 नुसार कारवाई केली जाणार आहे. देशभरात या संदर्भाने मॉक ड्रिलदेखील करण्यात आली आहे. यंदा परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा सराव शनिवारी करण्यात आला. मोबाईल सिग्नल जॅमरची कार्यक्षमता, मनुष्यबळाची उपलब्धता आणि बायोमेट्रीक प्रमाणीकरण प्रक्रियेची सुसुत्रता याचा सराव केला गेला. 2024-25 च्या परीक्षेत एमबीबीएसच्या 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच रद्द करण्यात आले आहेत. गैरप्रकार केल्याचे उघडकीस आल्यानंतर एमबीबीएसच्या 14 विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. तर 26 विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2024 मधील नीट युजीच्या आक्षेपार्ह निकालावरून देशात मोठा गोंधळ माजला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं होतं. काही विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा मार्ग अवलंबला होता. यंदा अशा प्रकारचा गोंधळ टाळण्याचे प्रमुख आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे.