राज्यातील तापमानाचा पारा कमी होणार? पाऊसही कोसळणार; हवामान खात्याचा अंदाज काय?

राज्यातील हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे, आगामी काही दिवसांत तापमानाचा पारा खाली जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे.

मुंबई: राज्यातील तापमानाचा पारा एप्रिलच्या तुलनेत काहीसा नियंत्रणात राहिलं असा अंदाज सांगितला जात आहे. मध्यमहाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत 42 अंशांवर गेलेले तापमान मे महिन्याच्या सुरूवातीपासून 40 अंशांपर्यंत खाली आहे आहे. याबाबत आता हवामान विभागाने आता नवा अंदाज वर्तवला आहे. तसेच अवकाळी पाऊस आणि गारपीटीबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणावर त्याचा परिणाम झाला आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, भंडारा- गोंदिया भागात गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटचे संकट आहे. विदर्भासह, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी 03 मे रोजी विदर्भातील काही भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस कोसळला होता. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याससह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. प्रामुख्याने नागभीड आणि मूल तालुक्यात वादळ, पाऊस आणि गारपीट झाली. नागभीड येथे वादळाने शहरभर धूळ उडवली आणि त्यानंतर पावसाने झोडपून काढले. या तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या. भाताचे उन्हाळी पीक कापणीवर आले असताना हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. यामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.

तापमान वाढणार की कमी होणार?

एप्रिलच्या तुलनेत मे महिन्याच्या सुरूवातीपासून तापमान काही अंशांनी कमी दिसत आहे. मुंबई शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातं तापमान नियंत्रणात आले आहे. तरी विदर्भात तसा कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. शहरांचे तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. अकोल्यात 44.9, चंद्रपूर 43.4, वाशिम 43, यवतमाळ शहराचे तापमान 43.4 अंश सेल्सियसवर गेले. मुंबईतील कुलाबात 34.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आले. पुणे शहराचे तापमान 40.3 अंशावर गेले. तापमान वाढीमुळे दुपारी संचारबंदी सदृश्य परिस्थिती शहरांमध्ये दिसत आहे. तापमान वाढीतून अजून दिलासा मिळणार नाही.  हवामान विभागाने 6 मे पर्यंत कोकण आणि गोवा विभागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे

 

 

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News