आयपीएल 2025 चा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सर्व संघ प्ले ऑफ्सची तिकीट पक्के करण्यासाठी झगडत आहेत. अशा परिस्थितीत आज आयपीएलचे दोन सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला आणि हंगामातील 53 वा सामना आज दुपारी 3.30 वाजता राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता क्नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल.
तर दुसरा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण पंजाब किंग्सला प्ले ऑफ्सची आशा कायम ठेवायची असेल तर आजच्या सामन्यातील विजय महत्वाचा आहे. हा सामना पंजाब विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स असा असेल. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा 54 वा सामना धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. पंजाबला होम ग्राऊंड असल्याने काही प्रमाणात फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण जिंकेल, कुणाचं पारडं जड?
राजस्थान रॉयल्स आधीच खेळातून बाहेर झालेला संघ आहे. दुसरीकडे कोलकाता संघर्ष करताना दिसत आहे. आयपीएल गुणतालिकेत कोलकाता संघ सध्या 7 व्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांदरम्यान खेळले गेलेले शेवटचे 31 सामने विचारात घेतले असता लक्षात येते की, केकेआरने 15 तर राजस्थान रॉयल्सने 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एकंदरीत दोन्ही संघांमध्ये आज अटीतटीचा सामना पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. तरी जाणकारांच्या मते कोलकाता आजचा सामना जिंकेल अशी शक्यता अधित आहे.
पंजाबसाठी विजय महत्वाचा
आजचा दुसरा सामना पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये खेळला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघ सध्या प्ले ऑफ्सपासून दूर आहे. परंतु पंजाबच्या संघाला अजून संधी दिसत आहे. पंजाबने या सीझनमध्ये आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. पैकी 6 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला असून एक सामना अनिर्णित आहे. त्यामध्ये संघाकडे सध्या 13 गुण असून संघ गुणतालिकेत 4 थ्या स्थानावर आहे. तसेच नेट रन रेट 0.199 आहे. हे स्थान सुधारण्यासाठी पंजाबला विजय गरजेचा आहे. तर लखनऊ संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
दोन्ही संघांच्या शेवटच्या 5 सामन्यांचा विचार केला असता लक्षात येते की, त्यापैकी लखनऊने 3 तर पंजाबच्या संघाने 2 सामने जिंकले आहेत. इतिहास असे सांगत असला तरी आजच्या सामन्याच पंजाब किंग्स विजय मिळवले, असा विश्वास क्रिकेट रसिक आणि तज्ज्ञांना आहे.