संजय कपूर यांची अब्जोंची मालमत्ता सावत्र मुलीच्या नावावर? जाणून घ्या

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे १२ जून रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कोट्यवधींच्या व्यवसाय आणि मालमत्तेच्या वारसदाराबाबत सतत प्रश्न निर्माण होत होते. काही दिवसांतच संजय कपूर यांच्या कंपनीला नवा चेअरमन मिळाला, पण त्यांची संपत्ती सर्वाधिक कुणाला मिळणार, हा प्रश्न मात्र चर्चेचा विषय ठरला.

संजय कपूर यांचे वैवाहिक जीवन

संजय कपूर यांनी आयुष्यात तीन लग्ने केली होती. पहिले लग्न त्यांनी फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबत केले, नंतर त्यांनी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केले ज्यांच्यापासून त्यांना एक मुलगी समायरा आणि मुलगा किआन झाला. करिश्माशी घटस्फोटानंतर त्यांनी प्रिया सचदेवसोबत तिसरे लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. पण संजय कपूर यांची सर्वाधिक संपत्ती त्यांच्या या तीनही मुलांपेक्षा त्यांच्या सावत्र मुलीला मिळणार आहे.

सावत्र मुलीला सर्वात मोठा वाटा!

संजय कपूर यांची एकूण संपत्ती अंदाजे १०,३०० कोटी रुपये इतकी आहे. ते ३१ हजार कोटींच्या ‘सोना कॉमस्टार’ कंपनीचे मालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांना या कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आले आहे. संपत्ती कोणाला किती मिळेल याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नसली, तरी वन इंडियाच्या रिपोर्टनुसार संजय कपूर यांची सर्वाधिक संपत्ती सफीरा चटवाल हिला मिळणार आहे.

कोण आहे सफीरा चटवाल?

सफीरा ही प्रिया सचदेव आणि तिचे माजी पती विक्रम चटवाल यांची मुलगी आहे. तिच्या पालकांच्या घटस्फोटानंतर ती आईबरोबर राहिली. रिपोर्टनुसार संजय कपूर यांनी प्रिया सोबत लग्न केल्यानंतर सफीरा याला आपली मुलगी म्हणून स्वीकारले आणि तिची जबाबदारी उचलली. भारतीय कायद्यांनुसार सावत्र मूल देखील दत्तक घेतले असल्यास वारस म्हणून संपत्तीवर तितकाच हक्क राखते जितका जैविक मुलांचा असतो. यामुळे संजय कपूर यांच्या संपत्तीत सर्वाधिक मोठा वाटा त्यांची सावत्र मुलगी सफीरा हिला मिळण्याची शक्यता आहे.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News