गायक पवनदीप राजनचा अपघात कधी आणि कसा झाला? आता कशी आहे तब्येत?

इंडियन आयडॉल सीजन 12 चा विजेता गायक पवनदीप राजन याचा भीषण अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पवनदीप उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. यावेळी पवनदीपसोबत आणखी दोघेजण होते. ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशीरा साधारण अडीच वाजेदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे.

कसा झाल हा अपघात?

गायक पवनदीप राजन आपल्या दोन सहकाऱ्यांसह दिल्लीच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. एमजी हेक्टर कारमधून हे तिघे उत्तराखंडहून दिल्लीच्या दिशेने जात होते. यादरम्यान अचानक त्यांच्या चालकाला डुलकी लागली. त्याच वेळी हायवेवर एक ट्रक उभा होता. चालकाला डुलकी लागताच त्याची कार समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात पवनदीप आणि त्याचे दोन्ही सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.

पवनदीपची तब्येत कशी आहे?

ऑर्थोपॅडिक टीमच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. त्याच्या शरीरातील काही भागांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. पवनदीपच्या दोन्ही पायाला फ्रॅक्टर असून डोक्यालाही जखम झाली आहे.

पवनदीप राजनबद्दल बोलायच झालं तर तो 2015 मध्ये रिअॅलिटी शो द वॉइस इंडिया सीजन १ मध्ये जिंकला होता आणि येथूनच त्याच्या संगीत क्षेत्रातील करिअरची सुरुवात झाली होती. यानंतर तो इंडियन आयडॉल 12 मध्ये विजयी झाला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या परीक्षकांनादेखील त्याच्या आवाजाचं वेड लागलं होतं. पवनदीपचा साधेपणा त्याच्या आवाजातही आहे. आवाजातील गोडवा आणि प्रामाणिकपणा यामुळे कमी कालावधीत त्याने चाहत्यांना मनात घर केलं होतं.

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News