अभिनेत्री शेफाली जरीवाल्याच्या निधनानंतर तिचा पती पराग त्यागी यानं काही पोस्ट शेअर केल्या. या पोस्टमध्ये त्यानं शेफालीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पत्नीच्या निधनानंतर तो अचानक सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय झाल्यानं अनेकांनी त्याला ट्रोल केलं. शेफालीच्या आठवणीत फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने, तो प्रसिद्धीसाठी हे सर्व करत असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला होता. या टीकेवर आता परागने एक भावनिक उत्तर दिले आहे.
परागचा दुःखातून सावरण्याचा प्रयत्न
परागने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. म्हणाला, “शेफालीला (परी) सोशल मीडियावर राहायला खूप आवडायचं आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम ती एन्जॉय करायची. मी स्वतः कधीच सोशल मीडियावर जास्त सक्रिय नव्हतो.” त्याच्या मते, आता शेफाली त्याच्या हृदयात आहे आणि तिला सर्वांचे प्रेम मिळत राहावे, हाच त्याचा प्रयत्न आहे.

सोशल मीडियावर ती नेहमी जिवंत राहील
“ती जरी आज आपल्यात नसली, तरी सोशल मीडियावर नेहमी जिवंत राहील. हे अकाउंट फक्त तिला समर्पित आहे आणि तिच्या आठवणी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करून मला त्या जपायच्या आहेत. मला नकारात्मक लोकांच्या मतांची पर्वा नाही,” अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावले आहे.
View this post on Instagram