केवळ ‘सितारे जमीन पर’च नाही, तर आमीर खानचे हे १२ चित्रपट कॉपीच, पाहा

आमिर खान याने त्याच्या करिअरमध्ये एकूण १२ चित्रपट हे दुसऱ्या सिनेमांचे रिमेक बनवले आहेत. आपण येथे ते चित्रपट कोणते आहेत, ते पाहणार आहोत.

Sitare Zameen Par : अभिनेता आमिर खान याला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. पण त्याच्या कारकिर्दीत काही चित्रपट असेही आहेत, जे परदेशी चित्रपटांपासून किंवा कथांपासून प्रेरित आहेत. त्यांना कॉपीही म्हटले गेले आहे. आता अलीकडेच आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत. यावेळी तो त्याचा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर है’ मुळे चर्चेत आला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर ज्या दिवशी प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून बऱ्यावाईट प्रतिक्रिया येत आहेत. लोक म्हणत आहेत. की या ट्रेलरमधला प्रत्येक सीन फ्रेम बाय फ्रेम कॉपी केलेला आहे. ‘सितारे जमीन पर’ आणि ‘चॅम्पियन्स’ या दोन्ही चित्रपटांच्या कथा खरंच खूपच एकसारख्या वाटतात. दोन्ही चित्रपटांमध्ये एका बास्केटबॉल कोचची कथा आहे, ज्याला विशेष गरजा असलेल्या खेळाडूंच्या टीमचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मिळते. विशेष म्हणजे ‘चॅम्पियन्स’ सुद्धा स्पॅनिश चित्रपट Campeones चा रिमेक होता.

आता आमिर खान याने त्याच्या करिअरमध्ये एकूण १२ चित्रपट हे दुसऱ्या सिनेमांचे रिमेक बनवले आहेत. आपण येथे ते चित्रपट कोणते आहेत, ते पाहणार आहोत.

गजनी (२००८)

कथानक कुठून कॉपी केले गेले- क्रिस्टोफर नोलनचा Memento (२०००)

या चित्रपटाची मुख्य कथा ‘मेमेंटो’ वरून प्रेरित आहे. परंतु भारतीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट अधिक व्यावसायिक आणि भावनिक शैलीत बदलण्यात आला होता.

मन (१९९९)
कथानक कुठून कॉपी केले गेले- An Affair to Remember (१९५७)

ही संपूर्ण कथा दोन लोकांभोवती फिरते, जे एका क्रूझवर भेटतात, प्रेमात पडतात आणि पुन्हा भेटण्याचे वचन देतात.

दिल है कि मानता नहीं (१९९१)

कथानक कुठून कॉपी केले गेले- It Happened One Night (१९३४)

ही कथा एका पळून गेलेल्या मुलीची आणि एका पत्रकाराची आहे, जे एकत्र प्रवास करतात. ही संपूर्ण कहाणी जवळपास It Happened One Night या हॉलीवूड क्लासिकवर आधारित आहे. आमिर खान आणि पूजा भट्ट यांची ही जोडी प्रेक्षकांना खूप भावली आणि ही फिल्म मोठी हिट ठरली.

जो जीता वही सिकंदर (१९९२)

कथानक कुठून कॉपी केले गेले: ब्रेकिंग अवे (१९७९)

कॉलेज स्पोर्ट्स आणि सायकल रेसिंगचेचा विषय हॉलिवूड चित्रपटासारखाच आहे. तथापि “जो जीता…” मध्ये भारतीय लोकांच्या भावना आणि फॅमीली ड्रामा दाखवण्यात आहे.

फना (२००६)

कथानक कुठून कॉपी केले गेले: आयज ऑन द नीडल (१९८१)

यात एक महिला एका पुरुषाच्या प्रेमात पडते, जो एक धोकादायक गुप्तहेर निघतो. कथानक अनेकांना ‘आय ऑफ द नीडल’ ची आठवण करून देते.

तारे जमीन पर (२००७)

कथानक कुठून कॉपी केले गेले: एवरी चाइल्ड इस स्पेशल, हॉलमार्क्स फ्रंट ऑफ द क्लास

हा चित्रपट अत्यंत मौलिक मानला जातो. पण त्याची मुळ कल्पना आंतरराष्ट्रीय डॉक्यूमेंट्री आणि टेलिफिल्म्समधून घेतल्या आहेत. पण आमिरची ट्रीटमेंट आणि दिग्दर्शन त्याला खास बनवते.

थ्री इडियट्स (२००९)
कथानक कुठून कॉपी केले गेले: चेतन भगत यांचा कादंबरी — ‘Five Point Someone’

ही फिल्म चेतन भगत यांच्या Five Point Someone या कादंबरीवर आधारित होती, पण पटकथेमध्ये बरेच बदल करण्यात आले होते. लेखक आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये श्रेयाबाबत वाद निर्माण झाला होता.

गुलाम (१९९८)
कोठून प्रेरित/कॉपी केलेली कथा: On the Waterfront (१९५४)

गुलाम हा एक जबरदस्त अ‍ॅक्शन ड्रामा होता, ज्यामध्ये आमिर खानच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच दमदार संगीतही होते या चित्रपटाची कथा On the Waterfront या १९५४ मधील हॉलीवूड चित्रपटावर आधारित होती. मात्र, दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी भारतीय सामाजिक परिस्थिती आणि भावनिक संदर्भ जोडत एक संस्मरणीय फिल्म तयार केली.

ठग्स ऑफ हिंदोस्तान (२०१८)

कथानक कुठून कॉपी केले गेले: कॅप्टन जॅक स्पॅरो (पायरेट्स ऑफ द कॅरिबियन)

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ (२०१८) प्रदर्शित होताना त्याला बरीच टीका झाली. कारण आमिर खानचे चित्रपटातील ‘फिरंगी मल्लाह’ हे पात्र ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ (पायरेट्स ऑफ द कॅरिबियन) वरून कॉपी केले होते. जरी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असला तरी, आमिर खानची देहबोली, उच्चार, पोशाख आणि कृती यामुळे त्याचे पात्र “जॅक स्पॅरो” च्या प्रतिमेशी पूर्णपणे जुळणार होते. म्हणूनच त्याच्यावर हॉलिवूडची नक्कल केल्याबद्दल टीका झाली.

लाल सिंग चड्ढा (२०२२)

कथानक कुठून कॉपी केले गेले: फॉरेस्ट गंप

‘लाल सिंग चड्ढा’ (२०२२) हा चित्रपट थेट हॉलिवूडच्या प्रतिष्ठित चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट अतुल कुलकर्णी यांनी बनवला होता. या रूपांतरात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. हेच कारण आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमत्कार करू शकला नाही.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News