बाबिल खानने शेअर केला भावुक व्हिडीओ, बंद केले इन्स्टाग्राम अकाउंट; जाणून घ्या कारण

दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाबिल खान रडताना दिसत आहे.

दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. बाबिल खानने इन्स्टाग्रामवर धक्कादायक व्हिडिओ शेअर केला असून त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते काळजीत पडले. बाबिलनं बॉलिवूड इंडस्ट्री आणि सेलिब्रिटींबद्दल केलेल्या ताज्या विधानामुळे त्याच्या चाहत्यांना, त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता वाटू लागली आहे. या विधानानंतर बाबिल खाननं त्याचे इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं आहे, आता यामुळे चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे.

बाबिल खान का रडला

बाबिल खानने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण काही काळानंतर, त्याने तो व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम फीडवरून डिलीट केला आणि त्याचे इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलीट केले. खरंतर, बाबिल या व्हिडीओमध्ये खूप रडताना दिसत आहे. त्याने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने चित्रपटसृष्टीत एकाकीपणा जाणवण्याबद्दल त्यानं या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, “बॉलिवूड खूप वाईट आहे, बॉलिवूड खूप असभ्य आहे. मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की, शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आणि अरिजित सिंग सारखे लोक आहेत…अजून बरीच नावं आहेत. बाबिल खाननं अनेक बॉलिवूड स्टार्सवर उघडपणे टीका केली. बॉलिवूड खूप घाणेरडं आहे. बॉलिवूड खूप वाईट आहे. ‘बॉलिवूड खूप असंस्कृत आहे.”  बाबिल खानचा हा   व्हायरल होतोय.

चुकून पोस्ट केला व्हिडिओ

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, बाबिल खानच्या टीमकडून एक विधान समोर आले की हा त्याच्या ‘लॉगआउट’ चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ होता, जो त्याने चुकून इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. “गेल्या काही वर्षांत, बाबिल खानला त्याच्या कामाबद्दल आणि त्याच्या मानसिक आरोग्या बद्दल उघडपणे बोलल्याबद्दल खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आहे. इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणे, बाबिलला कधीकधी कठीण दिवस येऊ शकतात. आणि हे त्यापैकीच एक होतं. बाबिल खान सुरक्षित आहे आणि लवकरच तो यासगळ्यातून बाहेर येईल.”

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News