यंदा श्रावण महिना कधीपासून? किती श्रावण सोमवार असणार? जाणून घ्या…

हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या उत्सवांना विशेष महत्त्व आहे. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे? जाणून घेऊया.

शिवभक्तांसाठी श्रावण महिना सर्वात पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे? जाणून घेऊया…

यंदा कधी सुरु होतोय श्रावण?

यंदा श्रावण 11 जुलै रोजी शुक्रवार पासून सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी शनिवारी संपेल. श्रावण मास हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पाचवा महिना आहे, जो साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात येतो. श्रावण महिन्याची विशेष पूजा भगवान शिव आणि पार्वती यांच्यासाठी केली जाते, आणि या महिन्यात सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात.

यंदा किती श्रावण सोमवार असणार?

यंदा श्रावण महिना 11 जुलै 2025 पासून सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी संपेल. या महिन्यात एकूण 4 श्रावण सोमवार आहेत.

  • पहिला श्रावण सोमवार : 14 जुलै 2025
  • दुसरा श्रावण सोमवार : 21 जुलै 2025
  • तिसरा श्रावण सोमवार : 28 जुलै 2025
  • चौथा श्रावण सोमवार : 4 ऑगस्ट 2025
  • श्रावण मास संपण्याची तारीख : 9 ऑगस्ट 2025 (शनिवार) 
.

श्रावण महिन्याचे महत्त्व

श्रावण मास भगवान शिव यांना समर्पित आहे, म्हणून या महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष महत्त्वाचा असतो आणि या दिवशी शिवपूजेला विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यामध्ये वातावरण शुद्ध आणि शांत असते. श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा यांसारखे अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यात दर सोमवारी उपवास आणि पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबतच अनेक धार्मिक विधी आणि व्रतांचे पालन केले जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News