वास्तुशास्त्रानुसार ‘या’ चुका चुकूनही करू नका, वाचा वास्तुशास्त्राचे नियम

अनेकदा आपण आपल्या नकळत काही चुका करतो, त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच तुमच्यावर आर्थिक संकट देखील कोसळू शकतं.

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण दिवसभरात जे कार्य करतो त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. बऱ्याचदा जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या काही चुकांमुळे एखाद्या व्यक्तीला वास्तुदोषांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

घरामध्ये खरकटी भांडी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, जेवणानंतर लगेच भांडी स्वच्छ धुवून टाका, अन्यथा लक्ष्मी माता नाराज होऊ शकते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास माता अन्नपूर्णा नाराज होते, त्यामुळे झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करा.

अन्न वाया जाऊ देऊ नका

जास्त अन्न घेऊन ते वाया घालवू नका, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार अन्न खाताना हे लक्षात ठेवले पाहिजे की जेवढे खावेसे वाटते तेवढेच घ्या. आपल्यापैकी काहीजण ताटात जास्त अन्न घेतात आणि फार कमी खातात, त्यामुळे अन्न वाया जाते. शास्त्रात ते अजिबात योग्य मानले जात नाही. त्यामुळे घराच्या आर्थिक विकासात अडचण निर्माण होते.

घराच्या दिशेनुसार वस्तू ठेवा

घराच्या दिशेनुसार योग्य वस्तू ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दिशेनुसार काही वस्तू ठेवण्याची विशिष्ट पद्धत आहे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. काही गोष्टी चुकूनही घरात ठेवायला नको, कारण त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. चुकीच्या ठिकाणी वस्तू ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात भांडणे आणि वाद वाढतात.

काटेरी झाडे काढून टाका

तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि प्रगती होत नसेल तर घरातील काटेरी झाडे काढून टाका. तुमच्या घरात छोटी हिरवी रोपे लावल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुम्हाला संपत्ती मिळेल.

पाण्याचा अपव्यय टाळा 

वास्तुशास्त्रानुसार विनाकारण पाणी वाहणे शुभ मानले जात नाही. वास्तूनुसार ज्या घरात असे घडते त्या घरात पैशाची कमतरता असते. याशिवाय अनावश्यक पैसा खर्च होतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News