शनि जयंतीच्या दिवशी करा हे काम, पितरांचे आशीर्वाद प्राप्त होईल, प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल

शनि जयंती यंदा २७ मे २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी शनि देवाची पूजा करण्यासोबत काही विशेष उपाय केल्यास तुम्हाला पितरांचे आशीर्वाद देखील मिळू शकतात.

Shani Jayanti 2025 : यंदा म्हणजेच २०२५ मध्ये शनि जयंती २५ मे रोजी साजरी होणार आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या अमावास्येच्या दिवशी शनि जयंती साजरी केली जाते.
हा दिवस शनि देवाची पूजा करण्यासाठी तसेच दान-पुण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

त्याचबरोबर वैशाख अमावास्येच्या दिवशी काही उपाय केले, तर पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी पितरांच्या निमित्ताने केलेल्या उपायांमुळे पितृ दोषापासून देखील मुक्ती मिळू शकते.

पिंडदान आणि तर्पण

शनि जयंतीच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी, तुम्ही पवित्र नदीत किंवा आपल्या घरीच पाण्यात गंगाजल मिसळून पितरांचे तर्पण करावे.

तसेच, “ॐ पितृदेव्यै नमः” किंवा “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करताना पितरांच्या निमित्ताने पिंडदान करणे उचित मानले जाते. या दिवशी पाण्यात काळे तीळ, कुशा, आणि दूध मिसळून तर्पण देणे विशेष फलदायी आणि पितृदोष निवारण करणारे मानले जाते.

गरजूंना अन्नदान करणे

पितरांच्या तृप्तीसाठी, शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना किंवा गरजूंना खीर, पुरी, चणाडाळ, भोपळा, चिंच इत्यादी पदार्थ खाऊ घालावेत. या दिवशी अन्नामध्ये तीळ आणि काळे मीठ वापरणे शुभ मानले जाते. जर तुम्ही अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान केले, तर शनि देव आणि पितरांची विशेष कृपा तुमच्यावर होते आणि पितृदोषही शांत होतो.

पीपळ पूजन आणि दीपदान

धार्मिक मान्यतेनुसार, पीपळाच्या झाडामध्ये पितरांचे वास असतो. म्हणूनच शनि जयंतीच्या दिवशी, पीपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पीपळाची सात वेळा प्रदक्षिणा करावी. यानंतर, पितरांच्या शांततेसाठी प्रार्थना केल्यास पितर प्रसन्न होतात. असे केल्याने अनेक पिढ्यांतील पितरांना शांती प्राप्त होते आणि पितृदोष कमी होतो.

या मंत्रांचा करा जप

शनि देव आणि पितरांची कृपा मिळवण्यासाठी, या दिवशी काही विशिष्ट मंत्रांचा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते.

पितरांच्या शांततेसाठी मंत्र – ॐ श्री पितृभ्यः नमः।

शनि ग्रहाचे मंत्र – ॐ शं शनैश्चराय नमः।
ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥

जर तुमच्या कुलात पितृदोष असेल, तर त्याचा परिणाम जीवनातील अनेक अडचणींमध्ये होऊ शकतो. अशा वेळी, शनि जयंतीच्या दिवशी वरील उपाय आणि मंत्रजप केल्यास, तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News