Open AI ने लाँच केले नवे टूल, आता प्रत्येक घरात तयार होतील कोडर, प्रत्येकजण बनेल इंजीनियर

OpenAI ने शुक्रवारी एका लाईव्ह स्ट्रीममध्ये आपल्या नवीन AI कोडिंग एजंट Codex ची घोषणा केली. हे ChatGPT मध्ये समाविष्ट केलेले एक कोडिंग असिस्टंट आहे, जे एकाच वेळी अनेक टास्क हाताळू शकते.

Open AI Codex : ओपन एआय (OpenAI) अलीकडेच आपला नवीन AI कोडिंग एजंट Codex लाँच केला आहे. तो आता ChatGPT मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा एक क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टूल आहे, जो एकाच वेळी अनेक डेव्हलपमेंट कामे हाताळू शकतो.

Codex विशेषत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मदतीसाठी डिझाइन करण्यात आला आहे, आणि तो OpenAI च्या हायटेक o3 reasoning मॉडेलच्या codex-1 व्हेरिएंटवर चालतो. अशा स्थितीत आपण येथे या टुलमधील ५ खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

१) Codex म्हणजे काय?

OpenAI ने शुक्रवारी एका लाईव्ह स्ट्रीममध्ये आपल्या नवीन AI कोडिंग एजंट Codex ची घोषणा केली. हे ChatGPT मध्ये समाविष्ट केलेले एक कोडिंग असिस्टंट आहे, जे एकाच वेळी अनेक टास्क हाताळू शकते.

Codex कोणती कामे करू शकतो:

  • फीचर इम्प्लिमेंटेशन (नवीन फिचर्स जोडणे)
  • बग फिक्सिंग (कोडमधील त्रुटी दुरुस्त करणे)
  • कोडबेस संबंधित तांत्रिक माहिती देणे

प्रत्येक टास्क एक सुरक्षित, स्वतंत्र सॅन्डबॉक्स वातावरणात चालतो, जे आधीपासूनच तुमच्या प्रोजेक्टच्या repository शी जोडलेले असते. त्यामुळे तुमच्या कोडिंग प्रक्रियेत सुरक्षितता आणि कार्यक्षमता दोन्ही जपली जाते.

२) कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे?

Codex हे OpenAI च्या o3 reasoning मॉडेलच्या एक सानुकूलित व्हर्जन codex-1 वर आधारित आहे. हे मॉडेल वास्तविक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या परिस्थितींवर ट्रेन करण्यात आले आहे, जेणेकरून हे मानवासारखी कोडिंग स्टाईल वापरू शकेल, दिलेल्या सूचनांचे अचूक पालन करेल आणि टेस्ट पास होईपर्यंत कोडमध्ये सुधारणा करत राहील.

3) कोणत्या युजर्ससाठी उपलब्ध आहे?
सध्या Codex हे ChatGPT Pro, Enterprise आणि Team प्लॅन्स असलेल्या युजर्ससाठी टप्प्याटप्प्याने रोल आउट केले जात आहे. लवकरच हे ChatGPT Plus आणि Edu प्लॅन्स मध्येही उपलब्ध करून दिले जाईल, जरी यासाठी अजून कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

४) कसे वापरायचे?

Codex हे ChatGPT च्या साइडबारमध्ये उपलब्ध आहे. तेथे तुम्ही नवीन प्रोग्रामिंग टास्क असाईन करण्यासाठी एक प्रॉम्प्ट टाकून “Code” हे पर्याय निवडू शकता. जर तुम्हाला कोडबेसबद्दल काही प्रश्न असतील, तर तुम्ही “Ask” बटण वापरून विचारू शकता.

प्रत्येक टास्क एक स्वतंत्र क्लाउड वर्कस्पेसमध्ये पूर्ण केला जातो, जिथे तुमच्या कोड फाइल्स आधीच लोड केलेल्या असतात.

५)  काम पूर्ण झाल्यानंतर काय होते?

जेव्हा Codex एखादे टास्क पूर्ण करतो, तेव्हा तो त्याच्या सॅन्डबॉक्समध्ये झालेले सर्व बदल सेव्ह करतो. याशिवाय, तो संपूर्ण प्रक्रियेचा टर्मिनल लॉग आणि टेस्ट निकाल देखील देतो, जेणेकरून युजरला हे समजू शकेल की काय-काय केले गेले आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News