आयफोन १६ स्वस्तात खरेदी करण्याची संधी, येथे मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, पाहा

कनेक्टिव्हिटीसाठी, बेस iPhone १६ मध्ये ५G, ४G LTE, Wi-Fi ६E, Bluetooth, GPS, NFC आणि USB Type-C यांचा सपोर्ट आहे. डिव्हाइसला डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी IP६८ रेटिंग देखील मिळाली आहे.

आयफोन १६ हा सप्टेंबर २०२४ मध्ये भारतात Plus, Pro आणि Pro Max या व्हेरिएंट्ससह लॉन्च करण्यात आला होता. बेस वर्जनमध्ये 3nm ऑक्टा-कोर A18 चिपसेट मिळतो आणि तो 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. लॉन्चच्या वेळी iPhone १६ ची किंमत ७९००० पासून सुरू होती. आता १२८GB वेरिएंट ६९,५०० पर्यंतच्या किंमतीत मिळत आहे. काही निवडक ऑनलाइन रिटेलर्स हे हँडसेट कमी किमतीत ऑफर करत आहेत आणि काही बँक ऑफर्समुळे किंमत आणखी कमी होऊ शकते.

iPhone १६ ची भारतातील किंमत आणि उपलब्धता

iPhone १६ चा १२८GB वेरिएंट Amazon वर ७३,५०० रुपयांमध्ये लिस्टेड आहे, जो लॉन्च किंमतीपेक्षा ६,४०० रुपयांनी कमी आहे. याशिवाय, ICICI, Kotak आणि Axis Bank क्रेडिट कार्ड युजर्सना त्वरित ४००० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. ज्यामुळे iPhone १६ ची प्रभावी किंमत भारतात ६९,५०० रुपयांइतकी होते. एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

दुसरी ई-कॉमर्स साइट Flipkart देखील iPhone १६ ला लॉन्च किंमतीपेक्षा कमी दरात विकत आहे. या स्मार्टफोनचा १२८GB वेरिएंट ७४९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड्सद्वारे युजर्सना यावर लगेचच ४००० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत ७०,९०० रुपये होते. Flipkart वरही एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, ज्याचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.

iPhone १६ चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iPhone १६ मध्ये ६.१-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये २००० nits पर्यंत पीक ब्राइटनेस, सेरामिक शिल्ड प्रोटेक्शन, आणि Dynamic Island फीचर आहे. हा फोन ३nm ऑक्टा-कोर A१८ चिपसेटसह येतो आणि ५१२GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजला सपोर्ट करतो. हे डिव्हाइस iOS १८ वर रन होते.

फोटोग्राफीसाठी, iPhone १६ च्या रिअरला ४८-मेगापिक्सेल मेन सेन्सर आणि १२-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. फ्रंटला १२-मेगापिक्सेल TrueDepth सेल्फी कॅमेरा मिळतो. अल्ट्रावाइड कॅमेरा मॅक्रो फोटोग्राफीला सपोर्ट करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी, बेस iPhone १६ मध्ये ५G, ४G LTE, Wi-Fi ६E, Bluetooth, GPS, NFC आणि USB Type-C यांचा सपोर्ट आहे. डिव्हाइसला डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी IP६८ रेटिंग देखील मिळाली आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News