भगवान जगन्नाथ 15 दिवसांसाठी आजारी का होतात? पुरी मंदिराचे चमत्कारिक रहस्य जाणून घ्या…

भगवान जगन्नाथ दरवर्षी १५ दिवसांसाठी आजारी पडतात, असे सांगितले जाते. या दिवसांना 'अनवसर' म्हणतात आणि या काळात मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद असतात.

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी येथे रथयात्रा आयोजित केली जाते. या दरम्यान भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र तीन वेगवेगळ्या रथांवर स्वार होतात. रथयात्रेत वापरले जाणारे रथ तयार करण्यासाठी सुमारे 11 महिने लागतात. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी केवळ देशातूनच नाही तर संपूर्ण जगातून लोक येतात.

रथयात्रा कधी सुरू होणार

भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. यावेळी ही यात्रा शुक्रवार 27 जून 2025 रोजी काढण्यात येणार आहे. या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रथांमध्ये विराजमान होऊन नगरपरिक्रमा करतात. पण, या प्रवासापूर्वी देव 15 दिवस एकांतवास मध्ये राहतात.

भगवान जगन्नाथ दरवर्षी 15 दिवसांसाठी आजारी पडतात

भगवान जगन्नाथ दरवर्षी 15 दिवसांसाठी आजारी पडतात, असे सांगितले जाते. या दिवसांना ‘अनवसर’ म्हणतात आणि या काळात मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद असतात. यामागे एक कथा आहे, ज्यानुसार एकदा भगवान जगन्नाथांनी आपल्या भक्ताचे दुःख स्वतःवर घेतले, त्यामुळे ते दरवर्षी 15 दिवस आजारी पडतात, असे मानले जाते. 

पौराणिक कथा

भगवान जगन्नाथ दरवर्षी 15 दिवसांसाठी आजारी पडतात, अशी एक पौराणिक कथा आहे. यालाच ‘अनासर’ म्हणतात. ही 15 दिवसांची विश्रांती रथयात्रेच्या आधी असते. कथेनुसार, एकदा माधवदास नावाचा भक्त आजारी पडला. त्याला 15 दिवसांचा आजार होता. भगवान जगन्नाथांनी त्याची दया येऊन ते 15 दिवसांचे आजारपण स्वतःवर घेतले. त्या दिवसापासून, भगवान जगन्नाथ दरवर्षी 15 दिवसांसाठी आजारी पडतात आणि त्यांचे दर्शन 15 दिवसांसाठी बंद असते. या 15 दिवसांच्या काळात, भक्त त्यांची पूजा करतात, परंतु त्यांना पाहिले जात नाही. या 15 दिवसांच्या काळात, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना ‘अनवसर’ घरात ठेवले जाते, जिथे त्यांची विशेष पूजा आणि औषधोपचार केले जातात. असे मानले जाते की, 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर, भगवान जगन्नाथ नवीन रूपात लोकांमध्ये येतात. त्यानंतर, ‘रथयात्रा’ काढली जाते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News