वास्तुशास्त्रानुसार घरातील पाण्याची टाकी ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? जाणून घ्या

घरातील कोणत्याही गोष्टी ठेवताना त्यांचं वास्तुशास्त्र पाहावं, असं न केल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ लागतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. 

वास्तुशास्त्रानुसार, हवा, पाणी आणि अग्नी यांसारख्या नैसर्गिक घटकांची दिशा निश्चित केली जाते. म्हणून, त्याचे विशेषतः पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच या घटकांशी संबंधित वस्तू योग्य दिशेने ठेवणे खूप महत्वाचे आहे. घरातील कोणत्याही गोष्टी ठेवताना त्यांचं वास्तुशास्त्र पाहावं, असं न केल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ लागतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते.  त्याचप्रमाणे, पाण्याची टाकी घराला पाणी पुरवते. पाण्याची टाकी योग्य दिशेला  ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. जर हे केले नाही तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते आणि आर्थिक अडचणी देखील निर्माण करू शकते. पाण्याची टाकी कोणत्या दिशेला ठेवणे शुभ आहे आणि कोणत्या दिशेला ठेवणे अशुभ आहे ते जाणून घ्या…

या दिशांना पाण्याची टाकी ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात पाण्याची टाकी नसावी. या ठिकाणी पाणी असल्याने घरातील लोकांना आजार होतात, तसेच कर्जही वाढते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या विविध दिशा आणि कोपऱ्यांमध्ये विशिष्ट ऊर्जा आणि महत्त्व असते. या तत्वांचे योग्य संतुलन साधल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते, तर संतुलन बिघडल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. पाण्याची टाकी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवणे टाळावे, कारण या दिशा नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समस्या दर्शवतात. पाण्याची टाकी किंवा पिण्याचे पाणी अग्नि किंवा नैऋत्य दिशेला ठेवल्यास ते नकारात्मक परिणाम देऊ शकते, त्यामुळे या दिशेला पाणी ठेवणे टाळावे. 

अग्नी आणि पाणी

आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला पाण्याची टाकी किंवा नळ ठेवू नये, कारण पाणी आणि अग्नी हे एकमेकांचे विरोधी तत्वे आहेत, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. 

पाण्याची टाकी ठेवण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला पाण्याची टाकी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा ही पाण्याचे तत्व दर्शवते, त्यामुळे या दिशेला पाण्याची टाकी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आकर्षित होते. पाण्याची टाकी उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारते. यासोबतच घरातील वातावरण शांत राहते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News