शनेश्वर जयंती, किंवा शनि जयंती, वर्षातून दोनदा साजरी केली जाते. शनिदेवाचा जन्म अमावस्येला झाला. शनि जयंतीला शनिदेवाची पूजा केल्याने सर्व संकटं दूर होतात. या वर्षी शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त
शनि जयंती कधी आहे?
वैशाख महिन्याच्या अमावस्या तिथीच्या दिवशी म्हणजेच 26 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी शनी जयंतीला सुरुवात होणार आहे. आणि 27 मे मंगळवारी सकाळी 8 वाजून 31 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार, शनी जयंती 27 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत देखील करतात.

शनि जयंतीचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04.03 ते 04.44 पर्यंत असेल आणि अभिजीत मुहूर्त : सकाळी 11.51 पासून ते दुपारी 12.46 पर्यंत असणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सरसोंचे तेल, निळ्या रंगाचे फूल, काळी उडीद, तीळ आणि काळे वस्त्र अर्पण करावे, असे सांगितले आहे. शनि जयंतीच्या दिवशी दान-पुण्य करणे शुभ मानले जाते.
शनि जयंतीचे महत्त्व
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यावर लोकांना त्यांची कृपा होते. लोक त्यांच्या वाईट दृष्टीपासून वाचतात. शनिच्या साडेसातीचा ज्यांना त्रास होतो, त्यांनाही या दिवशी पूजा केल्याने त्रासातून जरा दिलासा मिळतो. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाचे विशेष पूजन केले जाते, ज्यात काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे वस्त्र आणि शनिदेवाशी संबंधित वस्तू अर्पण केल्या जातात. शनिदेवाचे पूजन आणि उपासना करून त्याचा नकारात्मक प्रभाव कमी करता येतो. या दिवशी शनिदेवाच्या मंदिरांना भेट देणे, विशेष पूजा करणे आणि शनि स्तोत्र, शनि चालीसा आणि शनि मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)