क्रिकेट आता फक्त खेळापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मैदानाबाहेरही क्रिकेटपटूंचं ग्लॅमर, लक्झरी आणि स्टाईल स्टेटमेंट कमालीचं लक्ष वेधून घेतंय. जगप्रसिद्ध घड्याळ ब्रँड्स जसं की रोलेक्स, हबलोट, पाटेक फिलिप आणि पनेराई आता केवळ अब्जाधीश व्यापाऱ्यांच्या नव्हे, तर आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या कलाईवरही झळकत आहेत. आज आपण अशाच १० स्टार क्रिकेटर्सविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्याकडे आहेत सर्वात महागड्या आणि लक्झरी घड्याळांचा संग्रह.
विराट कोहली – रोलेक्स डेटोना (₹8.60 लाख)
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली स्टाईल आणि दर्जेदार घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे असलेलं रोलेक्स डेटोना हे टॅकीमेट्रिक स्केलसह येतं, जे सरासरी वेग मोजण्यास उपयोगी. त्याच्याकडे ऑडेमार्स पिगेट रॉयल ओक आणि पाटेक फिलिप यांसारखे इतर प्रीमियम घड्याळेही आहेत.

एम.एस. धोनी – पनेराई रेडिओमिर कॅलिफोर्निया (₹9.25 लाख)
‘कॅप्टन कूल’ धोनीसाठी हे घड्याळ त्याच्या शांत आणि ठाम स्वभावाशी अगदी साजेसं आहे. डिझाइन आणि डायलच्या विशिष्टतेमुळे हे घड्याळ फारच लोकप्रिय आहे.
रोहित शर्मा – रोलेक्स स्काय-डवेलर (₹10.7 लाख)
‘हिटमॅन’ रोहितचा स्टाईल सेन्स तितकाच खास आहे. काळ्या डायलने कस्टमाइज केलेलं हे घड्याळ तो अनेकवेळा झळकवताना दिसतो.
बेन स्टोक्स – हबलोट बिग बँग (₹38.96 लाख)
इंग्लंडचा सुपरस्टार ऑलराउंडर स्टोक्सकडे असलेलं हे घड्याळ तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याचा आधुनिक लूक आणि महागडी किंमत हे दोन्ही लक्षवेधी आहे.
जोस बटलर – रोलेक्स सी ड्वेलर
पाण्याखाली काम करण्यासाठी डिझाइन केलेलं हे घड्याळ बटलरकडे आहे. याचा वॉटरप्रूफ फीचर त्याच्या adventurous स्वभावाशी मिळतं-जुळतं.
फाफ डू प्लेसिस – पनेराई रेडिओमिर (₹5.24 लाख)
पनेराईचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेला फाफ हा स्टाईल आयकॉन मानला जातो. IPL दरम्यान त्याने हे घड्याळ घालून दिलेला लूक फार चर्चेत राहिला.
डेव्हिड वॉर्नर – हबलोट बिग बँग ब्लॅक मॅजिक (₹38.96 लाख)
ऑस्ट्रेलियाचा डॅशिंग फलंदाज वॉर्नरकडे असलेलं हे घड्याळ स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा उत्कृष्ट संगम दर्शवतं.
8. के.एल. राहुल – पाटेक फिलिप नॉटिलस 5712/ए (₹37.5 लाख)
सोशल मीडियावर स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेला राहुल हे घड्याळ अनेकदा flaunt करताना दिसतो. ही त्याच्या संग्रहातील सर्वात महागडी घड्याळ आहे.
युजवेंद्र चहल – रोलेक्स डेटजस्ट (₹8.19 लाख)
मस्तीखोर आणि लोकप्रिय चहलने धनश्रीसोबतच्या साखरपुड्यावेळी घातलेलं हे घड्याळ खूप चर्चेत आलं होतं.
मार्क वूड – डॅनियल वेलिंग्टन (₹15,000 – ₹20,000)
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडचं घड्याळ तुलनेनं कमी किमतीचं असलं तरी त्याचा क्लासिक आणि एलिगंट लूक डोळ्यात भरतो.