ठाकरे गटाला मुंबईत आणखी एक धक्का, तेजस्वी घोसाळकरांचा पक्षाला जय महाराष्ट्र

तेजस्वी घोसाळकर यांच्यावर पक्षानं दहिसर विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीची जबाबदारी सोपवली होती. साल 2017 मध्ये तेजस्वी घोसाळकर याच प्रभागातून शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

Tejashwi Ghosalkar – मूळ शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला जी गळती लागली आहे, ती थांबायचे काही नाव घेत नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धरतीवर आयाराम गयाराम यांना ऊत येत आहे. दररोद ठाकरे गटातील पदाधिकारी, नेते ही पक्षाला सोडून अन्य पक्षात जाताहेत. दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विनोद घोसाळकरांची सून आणि दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

वैयक्तिक कारणास्तव राजीनामा

दरम्यान, आज सकाळी तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी राजीनाम्याचे पत्र पक्षाला पाठवले यात त्यांनी म्हटलंय की, “मी तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.”

भाजपात जाण्याची शक्यता…

दुसरीकडे माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबाबत सतत नाराजी व्यक्त करूनही कोणतीच कारवाई न झाल्यानं तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मात्र शिनसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News