RCB Fans Virat Kohli Test Retirement : आईपीएल २०२५ चा थरार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी तणावामुळे आयपीएल एक आठवडा स्थगित करण्यात आले होते. पण आता आईपीएल पुन्हा सुरू होणार आहे. आईपीएलच्या ग्रुप स्टेजमधील बाकी राहिलेले सामने१७ मे पासून वेगवेगळ्या ६ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तर अंतिम सामना ३ जून रोजी होईल.
१७ मे रोजी आरसीबीची टीम केकेआरच्या संघाशी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना खेळणार आहे. या दिवशी, स्टेडियममध्ये चाहत्यांकडून विराट कोहली याच्यासाठी खास योजना बनवण्यात आली आहे. कोहलीने नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आरसीबी फॅन्सकडून खास ट्रिब्यूट देण्यात येणार आहे.

खरं तर, विराट कोहलीने १२ मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या या निर्णयामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला. कोहलीला टेस्ट क्रिकेटमध्ये फेयरवेल न मिळाल्यामुळे फॅन्स खूप नाराज आहेत.
चाहते पांढऱ्या रंगाची जर्सी घालून येणार
दरम्यान, चाहत्यांनी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये त्यांनी इतर फॅन्सना विनंती केली आहे, की ते १७ मे रोजी चिन्नास्वामी मैदानावर पांढऱ्या रंगाची टेस्ट जर्सी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालून उपस्थित राहावे, ज्यामुळे ते विराट कोहलीला टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल ट्रिब्युट आणि फेअरवेल देऊ शकतील. आता १७ मे रोजी चिन्नास्वामी मैदान पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या फॅन्सनी रंगणार आहे.
कोहली काय म्हणाला होता?
दरम्यान, कसोटीतून निवृत्ती जाहीर करताना कोहलीने सांगितले होते, की “माझ्या क्रिकेट करिअरमध्ये टेस्ट क्रिकेट माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. या खेळाने मला शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून आव्हाने दिली, परंतु त्याचबरोबर त्याने मला खरी मजा आणि समाधान दिले. १२ मे रोजी मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली, आणि हे माझ्यासाठी एक अत्यंत भावनिक क्षण आहे. मला माझ्या सर्व सहकाऱ्यां, प्रशिक्षक आणि फॅन्सचा दिल से धन्यवाद द्यायचा आहे. टेस्ट क्रिकेटच्या मैदानावर माझा प्रत्येक क्षण मी दिलेल्या संघर्ष आणि मेहनतीसाठी कृतज्ञ आहे.”