आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून मोर्चेबांधणी, निवडणूक प्रचारात गाजणार “हे” मुद्दे

या पालिका निवडणूक प्रचारात अनेक मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. यात प्रचारात अनेक महत्त्वाचे मुद्दे गाजणार आहेत. मुंबईत महिलांचा आरोग्याचा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे.

BMC Election – मागील तीन वर्षापासून ओबीसी आरक्षण यामुळे मुंबईसह अनेक महानगरपालिका निवडणुका रखडलेल्या आहेत. परंतु आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यात पालिका निवडणुकीच्या अधिसूचना जाहीर करा, आणि पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

माजी नगरसेवकांसाठी रस्सीखेच…

दरम्यान, पुढील चार महिन्यात मुंबई महानगरपालिकेतील निवडणूक होणार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी हे एकत्र निवडणूक लढणार? की स्वबळावर लढणार? हे अजून स्पष्ट झाले नसले तरी प्रत्येक पक्षाकडून रननीती आणि मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून शिवसेना ठाकरे गटातील, काँग्रेस आणि शरद पवार गटातील माजी नगरसेवकांना गळ घालण्यासाठी आणि आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपा आणि शिंदे यांच्या सेनेत रस्सीखेच सुरू आहे.

मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेतून अनेक 50 च्यावर माजी नगरसेवक हे शिंदे यांच्या सेनेत गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे फोडाफोडीचे राजकारण आणि माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी भाजप शिंदेच्या सेनेकडून रस्सीखेच होताना दिसणार आहे.

प्रचारात हे मुद्दे गाजणार…

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे पारडे जड होते. असून त्यांची सत्ता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांचे मुंबई महानगरपालिका याकडे लक्ष लागले आहे. या पालिका निवडणूक प्रचारात अनेक मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. यात प्रचारात अनेक महत्त्वाचे मुद्दे गाजणार आहेत. मुंबईत महिलांचा आरोग्याचा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे.

यासह मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन, मुंबईतील निकृष्ट दर्जाचे असलेले रस्ते, तसेच मेट्रो, मुंबईतील मालमत्ता कर, मुंबईतील पाण्याची समस्या, मुंबईतील प्रदूषण, आरे कारशेड, विशेष म्हणजे पावसात मुंबईची तुंबई होते आणि नालेसफाई हेही मुद्दे प्रचारात गाजण्याची शक्यता आहे. तसेच मागील पंचवीस वर्षापासून शिवसेना ठाकरे गटाने घोटाळा केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप हेही पालिका निवडणुकीत पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको.


About Author

Astha Sutar

Other Latest News