Bhushan Gavai – महाराष्ट्राचे पुत्र भूषण गवई यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाचे शपथ घेतली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी त्यांना शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर ते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. परंतु महाराष्ट्राच्या दौऱ्यावर प्रोटोकॉल न पाळल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदी म्हणजे मुख्य सरन्यायाधीश पदी शपथ घेतली. यानंतर ते महाराष्ट्राचे दौऱ्यावर आले आहेत. मात्र इथे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि जिल्हाधिकारी हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु थोड्या वेळानंतर कार्यक्रमात या तिघांनीही उपस्थित राहिले.

परंतु हे तिघेही राज्याचे मुख्य सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे त्यांनी राज्य नाराज व्यक्त केली असून, त्यामुळे सरन्यायाधीशांच्या नेमका प्रोटोकॉल का असतो? यावरून बरीच चर्चा होत आहे. तर दुसरीकडे सरन्यायाधीश यांच्या कोणत्याही कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि जिल्हाधिकारी हे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसा प्रोटोकॉल सांगतो.
सरन्यायाधीशाची सुरक्षा यंत्रणा कशी?
दुसरीकडे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च पदी असतात. त्यांना राष्ट्रपती ही शपथ देतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीशांना झेड सुरक्षा यंत्रणा किंवा झेड प्लस सुरक्षा यंत्रणा देण्यात येते. त्यामुळे सध्या महाराष्ट्रा दौऱ्यावर असले भूषण गवई यांना झेड प्लस सुरक्षा यंत्रणा देण्यात आली आहे. पण हे पद मोठे असल्यामुळे राजशिष्ट्यचार पाळणे गरजेचे आहे. त्यामुळं त्यांना झेड प्लस सुरक्षा यंत्रणा देण्यात येते.