भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्हाईट बॉल क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. न्यूझीलंडचा संघ जानेवारी २०२६ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळले जातील.
न्यूझीलंडचा भारत दौरा ११ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान असेल. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यापूर्वी, न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची मालिका असेल.

२०२६ मध्ये भारतीय संघाची ही पहिली मालिका असेल. याआधी, २०२५ च्या अखेरीपर्यंत टीम इंडिया खूप व्यस्त राहणार आहे. जून-डिसेंबर २०२५ दरम्यान, भारतीय संघाला इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत.
एकदिवसीय मालिका-
पहिला एकदिवसीय सामना – ११ जानेवारी २०२६ – बडोदा
दुसरा एकदिवसीय सामना – १४ जानेवारी २०२६ – राजकोट
तिसरा एकदिवसीय सामना – १८ जानेवारी २०२६ – इंदूर
टी२० मालिका-
पहिला टी२० – २१ जानेवारी – नागपूर
दुसरा टी२० – २३ जानेवारी – रायपूर
तिसरा टी२० – २५ जानेवारी – गुवाहाटी
चौथा टी२० – २८ जानेवारी – विशाखापट्टणम
पाचवा टी२० – ३१ जानेवारी – त्रिवेंद्रम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची २०२३-२५ ही सायकल आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका विजेता ठरला. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ मध्ये भारतासमोर पहिले आव्हान इंग्लंडचे असेल. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा २० जूनपासून सुरू होईल. त्यानंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेचे आव्हान पार करावे लागेल. डिसेंबर २०२५ पर्यंतच्या कालावधीत भारतीय संघाला इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल.