कर्नाटकच्या धरतीवर एसटी महामंडळात आता 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती, कोणत्या जिल्ह्यात विभाग होणार?

परिवहन महामंडळाच्या नियोजन आणि पणन खात्याअंतर्गत कार्यरत असलेल्या संनियंत्रण समित्यांचे कार्यालय डिसेंबर २०१६ पासून बंद करण्यात आले होते. पण कर्नाटक राज्याच्या धरतीवर एसटी महामंडळाचे निर्णय आणि विकेंद्रीकरणाची संकल्पना सरनाईक यांनी उचलून धरली. 

ST Corporation : आजही ग्रामीण भागातील लालपरी अर्थात एसटी ही दळणवळणासाठी मोठं साधन समजले जाते. गावाकडूल लोकांना एसटी ही जीवनवाहिनी मानली जाते. दरम्यान, परिवहन विभागाची सूत्रे जेव्हापासून प्रताप सरनाईकांनी हाती घेतली आहेत. तेव्हापासून एसटी महामंडळाचे उत्पन्न अधिक वाढवण्याचे प्रयत्न मंत्री प्रताप सरनाईक करताना दिसताहेत. दरम्यान, आता राज्यातील एसटी महामंडळाचे नियोजन व निर्णयाचे स्वातंत्र्य करण्याच्या हेतूने एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात येणार आहे.

नियोजन व निर्णयाचे स्वातंत्र्य …

दरम्यान, कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर राज्यात पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी एसटी महामंडळाकून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी हे परिपत्रक काढले असून, येणाऱ्या काही दिवसात हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरु करतील, अशी माहिती त्यांनी परिपत्रकातून दिली आहे.

कुठे होणार पाच प्रादेशिक विभाग?

दुसरीकडे महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्याचा हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. सुनियोजन, नियंत्रण व समन्वयासाठी ५ प्रादेशिक विभागांची रचना करण्यात आली असल्याचे महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले आहे. तसेच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याचे निर्देश डॉ. माधव कुसेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती होणार पाहूया….
१) मुंबई
२) नाशिक
३) नागपूर
४) पुणे
५) अमरावती


About Author

Astha Sutar

Other Latest News