vijay wadettiwar – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला. या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू ठेवले होते.
चौकटीत राहून काम करणे आवश्यक
पण काही सदस्य उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली, असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्ष पदाची एक गरिमा आहे अस असताना तिथून राजकीय भाषण होणे योग्य नाही, 30 वर्ष या सभागृहात काम करताना असा प्रकार घडलेला नाही अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली. संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत त्या चौकटीत राहून पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे.

अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने नको…
तालिका सभाध्यक्ष बसले असले तरी त्यांना अध्यक्ष म्हणून मानून मान दिला जातो पण विरोधी पक्षातील काही सदस्य उपस्थित नाही म्हणून राजकीय टिपण्णी केली जाते. जेव्हा की सभागृहाचे कामकाज नीट व्हावे ही जबाबदारी सरकारची असते, ज्या विभागाचा प्रस्ताव असतो त्या विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित आहेत की नाही हे पाहणे संसदीय कामकाज मंत्र्यांचे असते. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले.