हा कुठला विचार आहे, इंग्रजीला गळ्यात घेतात, आणि हिंदीवर वाद निर्माण करतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

काही लोकं हिंदीला नाकारत असताना, इंग्रजीला जवळ करतात... इंग्रजीला गळ्यात घेतात, आणि हिंदीवरून वाद निर्माण करतात, हा कोणता विचार आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis – राज्यात तिसऱ्या भाषेवरुनचा वाद नुकताच थांबला असताना आणि हिंदी सक्तीची जीआर सरकारने रद्द केला आहे. हे घटना ताजी असताना आता मराठी-हिंदीवरुन मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा वाद दिसून आला आहे. मीरा भाईंदरमध्ये एका दुकानदाराने हिंदीत बोलला, मराठी न बोलण्यावरुन मनसैनिकांनी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिका करत दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे.

मला यांचे आश्चर्य वाटते…

दरम्यान, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आणि हिंदी. मराठी आणि इंग्रजी वादावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मारहाणीची जी घटना झाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आणि काही लोकं हिंदीला नाकारत असताना, इंग्रजीला जवळ करतात… इंग्रजीला गळ्यात घेतात, आणि हिंदीवरून वाद निर्माण करतात, हा कोणता विचार आहे? मला याचं आश्चर्य वाटतं. त्यामुळे हिंदीवरून… मराठी बोलण्यावरून जो कोण कायदा हातात घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, मीरा भाईंदरमध्ये माझ्या दुकानाच्या कॅश काऊंटरजवळ ५ ते ६ मनसैनिक येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागवली. मात्र पाण्याची किती रुपयांची हवी आहे, १० रुपये की २० रुपये असं कॅश काऊंटरजवळच्या कर्मचाऱ्याने विचारलं. मात्र मनसे कार्यकर्ते म्हणाले की, हिंदी नाही तर मराठीत बोल… महाराष्ट्रात व्यापार करायचा  करायाचा असेल तर मराठीच बोलावे लागेल,असंही मनसैनिक म्हणत त्यांनी दुकान फोडून टाकण्याचीही त्यांनी धमकी दिली, दुकानातील कर्मचाऱ्यांना शिव्या दिल्या. शी माहिती त्या व्यापार्‍याने दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News