सैन्याच्या सन्मानार्थ मुंबईत निघणार ‘सिंदूर यात्रा’, मराठी अभिनेत्री आणि मान्यवर महिला सहभागी होणार

सिंदूर यात्रा मंगळवार (२० मे) रोजी मुंबईतील मणि भवन, गावदेवी येथून संध्याकाळी ४:३० वाजता सुरू होणार आहे.

Sindoor Yatra In Mumbai : महाराष्ट्रात प्रथमच एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या नेतृत्वात ‘सिंदूर यात्रा’चे आयोजन केले जात आहे. ही यात्रा भारतीय सैन्याच्या अदम्य शौर्याला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित असेल. सिंदूर यात्रा मंगळवार (२० मे) रोजी मुंबईतील मणि भवन, गावदेवी येथून संध्याकाळी ४:३० वाजता सुरू होणार आहे.

या सिंदूर यात्रेचे नेतृत्व वीरमाता अनुराधा ताई गोर आणि डॉ. मंजू लोढा करतील. यात्रेत १५०० हून अधिक महिला सहभागी होतील, ज्यामध्ये शहीद सैनिकांच्या पत्नी व कुटुंबीय, माजी सैनिक, समाजसेविका, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि इतर मान्यवर महिलांचा समावेश असेल.

सेनेच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी सिंदूर यात्रा

‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारतीय सेनेने दहशतवादाविरोधात केलेली एक अचूक आणि धाडसी कारवाई होती, जी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर राबवली गेली. ही यात्रा भारतीय सेनेच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रती एकजुटता दर्शवण्यासाठी आयोजित केली जात आहे.

या आयोजनाच्या माध्यमातून देशभक्ती, सामाजिक जागरूकता आणि भारतीय सेनेप्रती कृतज्ञतेचा संदेश दिला जाणार आहे. आयोजकांना अपेक्षा आहे, की ही संकल्पना केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना प्रेरणा देईल.

कार्यक्रमाचा समारोप राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणार आहे.

देशभरात तिरंगा यात्रा सुरू

पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे पूर्णपणे नष्ट केले. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. सैन्याच्या या जबरदस्त कारवाईनंतर सैन्याच्या सन्मानार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढली जात आहे. त्याच धर्तीवर, मुंबईत ‘सिंदूर यात्रा’ आयोजित केली जाईल, ज्यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध महिला व्यक्तिमत्त्वे देखील सहभागी होतील.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News