ब्रेन फॉग नेमकं काय आहे? हा आजार किती धोकादायक?

इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित नसेल तर व्हिडिओ अपलोड किंवा डाऊनलोड व्हायला वेळ लागतो. असंच काहीसं एखाद्या व्यक्तीसोबत घडलं तर त्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येऊ शकतं. एखाद्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे, तिची क्षमताही आहे, मात्र कारण नसताना थकवा, निराशा किंवा काहीतरी अडथळा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मेडिकल सायन्समध्ये याला ब्रेन फ्रॉग म्हटलं जातं. ब्रेन फ्रॉग काय आहे, हा कोणकोणत्या कारणांनी होतो?

ब्रेन फॉग किंवा मेंटल फॉग काय आहे?

मेडिकल सायन्सनुसार, ब्रेन फॉग किंवा मेंटल फॉग ह अनेक लक्षणांचा एक समूह आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, लक्षात ठेवणे आणि लक्ष केंद्रित करण्यात बाधा येते. ब्रेन फॉगमुळे लोकांना नियमित काम करण्यात अडचणी येऊ शकतात.

ब्रेन फॉगची लक्षणं काय आहेत?

तसं पाहता ब्रेन फॉगची अनेक लक्षणं आहेत. यामुळे विचार करण्याची, लक्ष केंद्रित करणे आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यातून मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. याशिवाय विचारांची दिशा नसणे, नीट बोलता न येणं, विचार करण्याची प्रक्रिया मंदावणे आणि त्वरीत प्रतिक्रिया देण्यास अडथळे येऊ शकतात.

ब्रेन फॉगची संभाव्य कारणं काय आहेत?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर, जास्त काळ रुग्णालयात उपचार घेत असल्यास, कर्करोगाच्या उपचारादरम्यान किंवा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे ब्रेन फॉगचा त्रास उद्भवू शकतो. याव्यतिरिक्त अपुरी झोप, ल्यूपस, मल्टीपल स्केलेरोसिस आणि फायब्रोमायल्गिया सारखे आजार, मधुमेह, तणाव, चिंता सारखी स्थिती असेल तर हा आजार होऊ शकतो.

ब्रेन फॉगच्या आजारावर काय आहेत उपचार?

सद्यस्थितीत ब्रेन फॉगसाठी कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. मात्र हा आजार रोखण्यासाठी जीवनशैलीतील बदल फायदेशीर ठरू शकतात. यासाठी रात्रीची पुरेशी झोप घ्यावी, पौष्टिक अन्न, दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम, मेंदूसंबंधित काम करीत असाल तर थकवा टाळण्यासाठी दर ३० मिनिटांनी छोटा छोटा ब्रेक घेण्याचा सल्ला दिला जातो.

 

(टीप – वरील लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. MP मराठी ब्रेकिंग याची पुष्टी करीत नाही)


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News