41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर अंतराळात, NASA Axiom Mission लाँच झाल्यावर काय म्हणाला शुभांशू शर्मा?

अंतराळात पोहचण्याचा शुभांशू याचा क्षण संपूर्ण भारतीयांनी माध्यमांवर अनुभवला. अंतराळात पोहचल्यानंतर शुभांशूनं व्हॉट अ राईड, असं म्हणत त्याचा संदेश पोहचवला आहे.

फ्लोरिडा- भारतीयांना ऐतिहासिक आणि अभिमान वाटावी अशी घटना आज घडली आहे. भारताचा अंतराळवीर शुभांशू शुक्ला एक्झियम मिशन 4 अंतर्गत इंटरनॅशनल स्पेस सेंटरसाठी रवाना झाला. यापूर्वी हे मिशन तब्बल सहा वेळा तांत्रिक कारणांमुळे रद्द झालं होतं. शुभांशू शुक्लासोबत इतर तीन अंतराळवीरही या मोहिमेसाठी रवाना झालेत.

अंतराळात पोहचण्याचा शुभांशू याचा क्षण संपूर्ण भारतीयांनी माध्यमांवर अनुभवला. अंतराळात पोहचल्यानंतर शुभांशूनं व्हॉट अ राईड, असं म्हणत त्याचा संदेश पोहचवला आहे. आपल्या खांद्यावर असलेला तिरंगा हे सांगतो आहे की मी आपणा सर्वांसोबत आहे, असंही शुभांशूनं म्हटलंय. दुसरीकडे मिशनचं लाँचिंग अंतराळात यशस्वीरित्या झाल्यानंतर शुभांशूची आई आशा आणि वडील शंभूदयाल हे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. टाळ्या वाजवून त्यांनी हा आनंद साजरा केला.

41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर अंतराळात

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि भारतीय एजन्सी इसरो यांच्यातील झालेल्या करारानुसार या मोहिमेसाठी भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशब शुक्ला यांची या मिशनसाठी निवड करण्यात आली. इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये जाणारे शुभांशू हे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा या भारतीय अंतराळवीरानं 1984 साली सोव्हिअत युनियनच्या स्पेस क्राफ्टमधून अंतराळसफर केली होती.

गगनयान मोहिमेसाठी होणार लाभ

शुभांशू याचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेसाठी कामी येणार आहे. भारताची ही पहिली मानव अंतराळ मोहीम आहे, ज्यात भारतातील अंतराळवीरांना पृथ्वीच्या जवळच्या अंतराळ कक्षेत पाठवून त्यांना सुरक्षित परत आणायचं आहे. 2027 साली गगनयान मोहीम लाँच होण्याची शक्यता आहे.

शुभांशू शुक्लांचा परिचय

१. शुभांशु शुक्लाचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौत,
२. एनडीए आणि आयएएफमधून लष्करी शिक्षण
३. बंगळुरूतून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एम टेक
४. 2006 मध्ये वायूदलात लढाऊ पायलट म्हणून रुजू
५. MIG-21, MiG-29, Su-30, Jaguar, Hawk विमाने चालवली
६. शुभांशूकडे सुमारे 2,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव
७. 2019 मध्ये ISROच्या गगनयान कार्यक्रमाकरता निवड
८. रशियात युरी गगारिन कोस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात अतिवैज्ञानिक प्रशिक्षण
९. आक्ष़िओम–4 मिशनचे मुख्य पायलट
१०. 41 वर्षांनंतर ISS वर प्रवास करणारा पहिला भारतीय

अ‍ॅक्सियम‑4 (Ax‑4) मोहीम काय आहे?

१. अ‍ॅक्सियम शोध कंपनी, नासा आणि स्पेसएक्स यांनी मिळून आयोजित केलेली खासगी मानवयुक्त मोहीम

२. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत
३. फ्लोरिडायेथून स्पेसएक्स फाल्कनवरून लाँच होणार
४. उद्या ISS मध्ये डॉकींग होणारआहे.
५. अंतराळ मोहिमेत चार सदस्यांचा समावेश
६. कमांडर पेगी व्हिटसन (यू.एस.), पायलट शुभांशु शुक्ला (भारत)
७. मिशन स्पेशॅलिस्ट सॉवॉस उझनॅन्स्की- विसनिव्हिस्की (पोलंड)
८. तिबोर कपूर (हंगेरी) .
९.अंदाजे १४–२१ दिवसाचा प्रवास, ISS वर अनुभव आणि प्रयोगांचे संकलन होणार
१०. अॅक्सियम‑4 मोहीम खासगी, बहुराष्ट्रीय सहकार्याच प्रतीक
११. जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित

शुभांशू इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये काय करणार?

शुभांशू 14 दिवस त्या ठिकाणी राहर असून सात प्रयोग करणार आहे. यातील अनेक प्रयोग भारतातील शिक्षण संस्थआंनी तयार केले असून ते जीवशास्त्राशी संबंधित आहेत. अंतराळात मानवी स्वास्थ्य आणि जीवांवर होणारा परिणाम याचा अभ्यास या दौऱ्यात करण्यात येणार आहे.

भारतानं या मिशनवर आत्तापर्यंत 584 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. प्रशिक्षण, उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय भागिदारीत याचा वापर करण्यात आलाय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News