नोबेल पारितोषिकासाठी ट्रम्प यांना कोणते कोणते देश नामनिर्देशित करू शकतात? जाणून घ्या

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन इराण आणि इस्रायल यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीमध्ये त्यांच्याद्वारे घेतलेल्या भूमिकेमुळे देण्यात आले आहे. फॉक्स न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकन काँग्रेस सदस्य बडी कार्टर यांनी ट्रम्प यांना या पुरस्कारासाठी सुचवले आहे. त्यांनी नोबेल शांतता पुरस्कार समितीला यासाठी औपचारिक पत्रही लिहिले आहे.

विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही आहे, की ट्रम्प यांना नोबेलसाठी नामांकन मिळाले आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन संसद सदस्य डॅरेल इस्सा यांनीही त्यांना नोबेलसाठी नॉमिनेट केले होते. याशिवाय, काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीही ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार द्यावा, अशी शिफारस करणारे पत्र नोबेल समितीला लिहिले होते.

कोण करू शकतो नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन?

नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणीही कोणालाही नामांकित करू शकत नाही. त्यासाठी विशिष्ट पात्रता असते. केवळ नोबेल समितीने अधिकृत मानलेले व्यक्तीच हे नामांकन करू शकतात. यात राष्ट्रपती, पंतप्रधान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती, आधीचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते, विद्यापीठांतील राजकारण, कायदा, इतिहास व समाजशास्त्र विषयांतील प्राध्यापक, नोबेल समितीचे सध्याचे व माजी सदस्य, आणि शांतता व मानवाधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही मान्यताप्राप्त संस्थांचे प्रमुख यांचा समावेश होतो.

नामांकन प्रक्रिया

प्रत्येक वर्षी नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात सुरू होते. याची अंतिम तारीख 31 जानेवारी असते. नोबेल समिती ही नामांकने तपासते आणि ऑक्टोबरमध्ये विजेत्याची घोषणा केली जाते. हा पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, म्हणजेच 10 डिसेंबरला प्रदान केला जातो.

2026 च्या नोबेल पुरस्कारासाठी सप्टेंबरमध्ये नोंदणी सुरू होणार आहे, पण अंतिम तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. 2025 साठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 338 नामांकने आले आहेत, ज्यात 244 व्यक्ती आणि 94 संस्था समाविष्ट आहेत. कोणत्या देशांना नामांकनाचा अधिकार नाही, याबाबत मात्र अजून कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News