इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी का झाली, ट्रम्प यांची मध्यस्थी की आणखी काही कारणं?

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध तूर्त थांबण्यामागे आणखीही काही कारणे असल्याचं सांगण्यात येतंय. त्यातील प्रमुख चार कारणं जाणून घेऊयात.

नवी दिल्ली- इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धात अखेर १२ दिवसांनी शस्त्रसंधी झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्याचं श्रेय घेत आहेत. आपल्यामुळेच हे युद्ध थांबलं असा दावाही ट्रम्प यांच्याकडून करण्यात येतोय. यासाठी ट्रम्प यांना शांततेचं नोबेल मिळावं असा प्रस्तावही अमेरिकेच्या संसदेतून पाठवला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र इराण आणि इस्रायलचं युद्ध संपण्यासाठी केवळ ट्रम्प यांची मध्यस्थीच जबाबदार होती का, हा प्रश्न आहे

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध तूर्त थांबण्यामागे आणखीही काही कारणे असल्याचं सांगण्यात येतंय. त्यातील प्रमुख चार कारणं जाणून घेऊयात.

१. युद्धाच्या मैदानात एकाकी-

इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश युद्धाच्या मैदानात एकाकी पडले. इराणला रशिया, चीन, उत्तर कोरिया सारख्या देशांनी पाठिंबा दिला, त्याबाबतची जाहीर वक्तव्यही करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात युद्धातील सैनिकी मदत कुणीच केली नाही. हुती, हिजबुल्ला आणि हमासही इतके कमकुवत झाले आहे ती तेही इराणसाठी उभे राहू शकले नाहीत. इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिका पुढे आली खरी मात्र सैन्य मदत करण्यात आली नाही. गाझत ज्याप्रमाणे अमेरिकेची मदत मिळाली तशी मदत मिळू शकली नाही. मात्र 22 जूनला अमेरिकेनं इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम सुरु असलेल्या प्रयोगशाळांवर बॉम्बहल्ले मात्र केले.

२. युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान-

१३ चे २४ डून या काळात चाललेल्या युद्धा दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं. एकट्या इराणमध्ये युद्धात 600 जणांचा मृत्यू झाला तर पाच हजारांपेक्षा जास्त जण जखमी झाले. तर इस्रायलमध्ये 28 जणांचा युद्धात मृत्यू झाला तर 3000 हून अधिक जणं जखमी झाले. इराणनं इस्रायलच्या तेल अवीव, बीर्शेबा आणि हाइफासह मोठ्या शहरांवर हल्ले केले. इराणच्या हल्ल्यात मोसादचं मुख्यालय, रहिवाशी इमारती, हॉस्पिटल्स आणि सरकारी कार्यालयं उद्ध्वस्त झाली. तर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणच्या नतांज, फोर्डो आणि इस्फहान या ठिकाणच्या आण्विक प्रयोगशाळांचं अपरिमिच नुकसान झालं. यासोबतच इराणची अनेक शहरं आणि सैन्याचे अधिकारी या युद्धात लक्ष्य करण्यात आले.

३. हल्ला करण्याचं ध्येय पूर्ण –

ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इस्रायली सैन्य आणि पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलेल्या निवेदनात युद्ध करण्याचं ध्येय पूर्ण केल्याचा उल्लेख करण्यात आलाय. इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखणं हा या हल्ल्याचा मुख्य उद्देश होता. या युद्धामुळे इराणची अण्वस्त्र निर्मिती प्रक्रिया ठप्प झाली असल्याचा दावा करण्यात आलाय. दुसरीकडे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा कौन्सिलनं सांगितलं की, इराणनं शत्रू राष्ट्राला पश्चाताप आणि पराभव स्वीकारण्यास भाग पाडलं.

४. इतर देशांचा दबाव –

जागतिक पातळीवर जी सेव्हन समिटमध्ये अनेक देशांनी इराण आणि इस्रायलला युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं होतं. यात भारत, सौदी अरब, इंग्लंड, दुबई, कतार, कॅनडा, रशिया आणि चीन या देशांचा समावेश होता. या राष्ट्रांच्या दबावामुळेही दोन्ही देशांना शस्त्रसंधीच्या निर्णयापर्यंत यावं लागलं.


About Author

Smita Gangurde

Other Latest News