पॅरिस – म्युझिक फेस्टिव्हलसाठी आलेल्या गर्दीचा फायदा घेत, गर्दीवर सीरिंज हल्ला केल्याची धक्कादायक घटना फ्रान्समध्ये घडली आहे. वार्षिक संगीत महोत्सव असलेल्या फेते डे ला म्युझिक या कार्यक्रमात हा प्रकार घडला. एकाचवेळी गर्दीत आलेल्या अनेकांना सीरिंज टोचल्यात आल्याचं समोर आलं. असे सीरिंज हल्ले अचानक आणि लपूनछपून केले जातात.
या सीरिंजमधून डेट रेप ड्रग्ज देण्यात आले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. नागरिकांना बेशुद्ध करण्यासाठी या ड्र्ग्जचा वापर करण्यात येतो. यातील काही पीडितांना त्यानंतर चाचणीसाठी रुग्णालयातही नेण्यात आलं. ही घटना घडल्यानंतर कार्यक्रमात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अनेक संशयितांची याचा फायदा घेत घटनास्थळी तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

देशभरातून 145 सीरिंज देण्यात आल्याच्या तक्रारी, 12 जणांना अटक
इंजेक्शन देण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 12 संशयितांना अटक केली आहे. या घटनेच्या पूर्वी एका फेमिनिस्ट इन्फ्लुएन्सरनं महिलांना सीरिंजद्वारे लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा दिला होता. ही पोस्ट नेमकी कुणी आणि कुठून केली होती, याचा शोध अद्याप लागलेला नाही.
देशात 145 जणांवर सीरिंज हल्ला झाल्याची माहिती फ्रान्सच्या गृह मंत्रालयानं दिली असून यात पॅरिसमधील 13 घटनांचा समावेश असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
देशातून 370 पेक्षा जास्त संशयित ताब्यात
यापूर्वी फ्रान्समध्ये 2022 साली क्लब, बार आणि संगीतांच्या कार्यक्रमात सीरिंज हल्ल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. सरकारनं त्यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं.सीरिंजमधून ड्रग्ज देण्याचा प्रयत्न झाला तर पोलिसांतं तक्रार करण्याचं आणि वैद्यकीय चाचणी करुन घेण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.
यावेळी या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये 370 जणांना विविध कारणांसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. यात पॅरिसमधील 90 जणांचा समावेश आहे. 14 जणं गंभीर जाले आहेत. तर 13 पोलीसही या गोंधळात जखमी झाल्याची माहिती आहे.
जगात अशांतता आणि युद्धाचं वातवरण असताना घडलेल्या या घटनेनं नागरिक भयभीत झाले आहेत. दहशतवादी हल्ल्याचा हा नवा प्रकार आहे का, याचा तपास आता करण्यात येतोय.