अमृतसरचे जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी!

अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला बॉम्बहल्ल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपसा सुरू आहे.

पंजाब राज्यातील अमृतसरमधील सुवर्णमंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. आता या सुवर्ण मंदिराला बॉम्बहल्ल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. शिवासय पोलिसांकडून घटनेता तपास सुरू आहे.

धमकी आल्याने भाविकांमध्ये घबराट

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने सुवर्ण मंदिर, त्याची परिक्रमा, लंगर हॉल आणि सराय भागात अतिरिक्त सुरक्षा उपाय राबवले आहेत. टास्क फोर्सला विशेष निरीक्षणाचे आदेश देण्यात आले असून कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित कारवाईचे निर्देश दिले गेले आहेत. SGPC चे मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी या बाबत माहिती दिली आहे.या धमकीची माहिती स्थानिक पोलीस ठाणे आणि अमृतसर पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे. SGPC चे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा ईमेल भीती पसरवण्यासाठी मुद्दाम पाठवण्यात आल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या असून मंदिर परिसरात CCTV निरीक्षण वाढवण्यात आले आहे. भाविक आणि पर्यटकांची बारकाईने तपासणी सुरू आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुवर्णमंदिर जगभरात प्रसिद्ध

अमृतसरचे सुवर्णमंदिर हे शीख धर्माचे प्रमुख तीर्थस्थान असून ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पंजाब राज्यातील अमृतसर शहरात स्थित असलेले हे मंदिर “हरमंदिर साहिब” या नावानेही ओळखले जाते. मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे संपूर्ण सोन्याने मढवलेले गुंबज आणि शांततादायक सरोवर. दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिरात भव्य लंगर व्यवस्था असते, जिथे सर्व जातीधर्मांतील लोकांना मोफत भोजन दिले जाते. सुवर्णमंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, एकतेचे आणि सेवाभावाचे प्रतीक मानले जाते. त्याची स्थापत्यकला, अध्यात्मिक वातावरण आणि ऐतिहासिक महत्वामुळे ते जगभरात प्रसिद्ध आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News