पहलगाम मधील हल्ल्यानंतर जल सिंधू करार रद्द, काय आहे जलसिंधू करार?

सिंधू नदी करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक ऐतिहासिक जल करार आहे जो 1960 मध्ये करण्यात आला होता या करारामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदी प्रणालीच्या पाणी वाटप आणि व्यवस्थापनासाठी हा करार करण्यात आला होता. मात्र आता हा पहलगाम या हल्ल्यानंतर सिंधू नदी करार रद्द करण्यात आला आहे

मुंबई – काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला आहे. टीआरएफ दहशतवादी संघटना आहे ती पाकिस्तानशी संबंधित असल्याचे बोलले जाते. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर द्या, अशी तळागाळातील लोकांची भावना आहे. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल… जशास तसे उत्तर जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना दिला आहे. या सर्व घडामोडीनंतर लवकरच भारताकडून पाकिस्तानचे कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि ज्या पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत. त्याबद्दल जलसिंधू करार भारताकडून रद्द करण्यात आला आहे

सिंधू जल करार रद्द…

दुसरीकडे पाकिस्तानकडून आणि भारताच्या सीमेकडून वारंवार आणि सातत्याने अतिरेकी हल्ले होत आहेत. हे हल्ले होत असताना आपण शांत कसे बसायचे, हल्ल्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी लोकांची भावना आहे. तर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीने 1960 रोजी सिंधू जल करार केला होता. तो करार पाकिस्तानसोबतचा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानसोबत हा करार केला होता. परंतु पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि पाकिस्तानच्या सीमेकडून होणारे हल्ले हे लक्षात घेता हा सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. हा करार रद्द करण्यानंतर पाकिस्तानमधून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, याचे परिणाम पाकिस्तानमध्ये जाणवत आहेत.

काय आहे जलसिंधू करार…

सिंधू पाणी करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पाणी वाटप करार आहे , जो जागतिक बँकेने आयोजित केला आहे आणि वाटाघाटी करून सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर केला आहे . १९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष फील्ड मार्शल अयुब खान यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती. २३ एप्रिल २०२५ रोजी, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी २०२५ च्या बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. या करारामुळे भारतात असलेल्या बियास , रावी आणि सतलज या तीन “पूर्व नद्यांच्या” पाण्यावर नियंत्रण मिळते. ज्यांचा सरासरी वार्षिक प्रवाह ४१ अब्ज घनमीटर (३३ दशलक्ष एकरफूट ) आहे. भारताला, तर भारतात असलेल्या सिंधू , चिनाब आणि झेलम या तीन “पश्चिम नद्यांच्या” पाण्यावर नियंत्रण पाकिस्तानला मिळते, ज्यांचा सरासरी वार्षिक प्रवाह ९९ अब्ज घनमीटर आहे


About Author

Astha Sutar

Other Latest News