नवी दिल्ली: आयपीएल 2025 या सिझनसाठी बीसीसीआयने एक नवा उपक्रम टाटा समुहासोबत सुरू केला होता. तो उपक्रम म्हणजे काही डॉट बॉलमागे काही झाडांची लागवड करणे. आता या उपक्रमाच्या माध्यमातून देशात लाखो झाडे लावल्याचा आणि यापुढे लावणार असल्याचा दावा केला आहे.
बीसीसीआयचा दावा काय?
प्रत्येक सामन्यात पडलेल्या एका निर्धाव चेंडूसाठी बीसीसीआय 500 झाडे लावणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या मोहिमेला आता विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आतापर्यंत मुंबई संघाने सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले आहेत. नियमावलीनुसार एका निर्धाव चेंडूमागे 500 झाडे यानुसार जो आकडा येईल, तेवढी झाडे लावली जातील.

बीसीसीआयचा दावा खरा?
मुंबईमुळे सर्वाधिक 1 लाख 77 हजार झाडे सद्यस्थितीनुसार लावली जाणे अपेक्षित आहे. आतापर्यंत कुठे किती झाडे लागली याची आकडेवारी उपलब्ध नाही. 6 दिवसांआधीच्या वृत्तानुसार 4 लाख झाले लावल्याचा दावा बीसीसीआयने केला आहे.
कोणता संघ किती झाडे लावणार?
संघ निर्धाव चेंडू झाडे
मुंबई इंडियन्स 354 1,77,000
गुजरात टायटन्स 335 1,67,000
लखनऊ सुपर जायंट्स 318 1,59,000
बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स 312 1,56,000
कोलकाता क्नाईट रायडर्स 311 1,55,500
दिल्ली कॅपिटल्स 309 1,54,500
चेन्नई सुपर किंग्स 298 1,49,000
पंजाब किंग्स 295 1,47,500
राजस्थान रॉयल्स 289 1,44,500
सनराजयर्स हैदराबाद 254 1,27,000