लहान मुलं डब्यात दिलेली भाजी पाहून नाक मुरडतात आणि भाजी खातच नाहीत. काहीवेळा मुलं त्यांच्या आवडीची भाजी नसल्यामुळे डबा घेऊन जाण्यास टाळाटाळ करतात. मुलांना रोज काहीतरी वेगळा पदार्थ हवा असतो. रोज मुलांसाठी काय वेगळ बनवायच असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना, आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी टेस्टी पनीर कॉर्न सँडविच कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य
- ब्रेड
- स्लाईस पनीर
- स्वीट कॉर्न
- कांदा
- हिरव्या मिरची ची पेस्ट
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- चाट मसाला
- तेल
- बटर
पनीर कॉर्न सँडविच बनवण्याची सोपी पद्धत
पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक पॅन घ्या आणि त्यात तेल घाला आणि ते गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. यानंतर त्यात उकडलेले कॉर्न, हिरव्या मिरची ची पेस्ट आणि मीठ घाला आणि चांगले मिक्स करून घ्या. नंतर त्यात चिमूटभर हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, चाट मसाला वगैरे घालून सर्व काही नीट मिक्स करून घ्या. हे शिजल्यावर त्यात किसलेले पनीर घालावे. पनीर घातल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा, सर्व गोष्टी नीट मिक्स करा. त्यानंतर कोथिंबीर टाका. एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यावर थोडे बटर घाला. नंतर ब्रेडचा स्लाईस ठेवा. ब्रेड स्लाईसवर किसलेले चीज पसरवा. या स्लाइसवर पनीरचे स्टफिंग ठेवा आणि स्लाइसवर पसरल्यानंतर दुसऱ्या ब्रेडने झाकून ठेवा. बटरच्या मदतीने सँडविच दोन्ही बाजूंनी पलटवून सोनेरी होईपर्यंत बेक करा. गरम गरम पनीर कॉर्न सँडविच मुलांना सर्व्ह करा.
