मुंबई: पहलागम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरमध्ये हजारो पर्यटक अडकले, हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. पर्यटकांना आता सुखरूप आपल्या राज्यांत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता उन्हाळ्याचे सुट्टीचे दिवस सुरू असल्याने आता पर्यटक काश्मिरला पर्यायी ठिकाणे अथवा पर्यटनस्थळांचा शोध घेत आहेत. यासाठी भारतामध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत.
उटी, तामिळनाडू
तामिळनाडूमधील उधगमंडलम हे ठिकाणी भारताचे मिनी काश्मिर म्हणून ओळखले जाते. निसर्गरम्य सौंदर्य, वसाहती आकर्षण, आदिवासी संस्कृती, ऊटी टॉय ट्रेन, पर्वत, तलाव, बागा, धबधबे, वन्यजीव आणि विहंगम दृश्ये ऊटीला एक परिपूर्ण सुट्टीचे ठिकाण बनवतात. ऊटीला लाखो पर्यटक भेट देतात. ऊटी हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. गोंधळापासून दूर असलेल्या या निसर्गाच्या आश्रयस्थानात स्वतःला आराम द्यायचा असेल तर नक्की जावे. ऊटीला तुमच्या सुट्टीची योजना करा!

केरळमधील पर्यटनस्थळे
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील केरळ हे राज्य निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. केरळ देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण मानले जाते. शहरे व खेड्यांना जोडणाऱ्या नदी, किनारे, तलाव व कालवे यांच्या बॅकवाटर मधील पर्यटनासाठी,मुन्नार,थेकडी येथील कॉफी मसाल्याच्या बागा, आयुर्वेदिक केरळी मसाज साठी दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. त्यामुळे तुम्ही जर काश्मिरला पर्याय म्हणून एखाद्या पर्यटनस्थळाच्या शोधात असला तर केरळ हा उत्तम पर्याय ठरू शकते.
दार्जिलिंग उत्तम पर्याय
दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्यातील हिल स्टेशन आहे. हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जे त्याच्या नयनरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. दार्जिलिंग हे पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी, पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागात आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2045 मीटर उंचीवर आहे. दार्जिलिंग चहासाठी आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कांचनजंगा पर्वतरांगांचे सुंदर दृश्य दिसते. दार्जिलिंग टॉय ट्रेनसाठी देखील प्रसिद्ध आहे, जी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे.