Tea Time Recipe Snacks Marathi: दुपारच्या जेवणानंतर चहाच्या वेळी आपल्याला हलकीशी भूक लागलेली असते. यावेळी चहासोबत काहीतरी हलके-फुलके खावेसे वाटते. त्यामुळे चहाची मजा तर वाढतेच शिवाय आपली भूकही भागवली जाते. त्यामुळे स्त्रिया सतत चटपटीत रेसिपी शोधत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक हलकी फुलकी रेसिपी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला घरात असणाऱ्या साहित्याचीच गरज असणार आहे. आज आपण गव्हाच्या पिठाची पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही चटपटीत पुरी चहासोबतसुद्धा खाता येते. चला तर मग पाहूया रेसिपी….

साहित्य-
-१ वाटी गव्हाचे पीठ
-२ चमचे तूप
-१ टीस्पून ओवा
-१ टीस्पून काळी मिरी पावडर
-१ टीस्पून तिखट
-१ चमचा हळद
-१ चमचा मीठ
-१/२ टीस्पून हिंग
-तळण्यासाठी तेल
रेसिपी-
स्टेप १-
पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ, तूप आणि सर्व मसाले एकत्र करा.
स्टेप २-
आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ मळून घ्या आणि पीठ तयार आहे.
स्टेप ३-
पिठाचे छोटे गोळे बनवा आणि ते पुऱ्या बनवा आणि काट्याने त्यात छिद्र करा.
स्टेप ४-
मंद आचेवर तेल गरम करा आणि सर्व पुऱ्या गुलाबी होईपर्यंत तळा. चहाच्या वेळेसाठी तिखट पुरी तयार आहे.