केदारनाथ, बद्रीनाथ चारधाम यात्रेचं नियोजन ? ‘या’ दिवशी उघडणारं दरवाजे

चारधाम यात्रेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे, याच चारधाम यात्रेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

नवी दिल्ली: सनातन धर्माचं पालन करणाऱ्या हिंदू जनांमध्ये चारधाम यात्रेला विशेष महत्व असते. या चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ, बद्रीनाथ या ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश होतो. लाखो भक्त या ठिकाणी जात असतात. आता याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार धामला भेट देणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळते., अशी धारणा लोकांमध्ये आहे. लवकरच 2025 ची चारधाम यात्रा सुरू होणार आहे, म्हणून बाबा केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची नेमकी तारीख जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

30 एप्रिलपासून चारधाम यात्रा

पवित्र चारधाम यात्रा 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार आहे. जिथे यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता उघडले जातील. तसेच, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने जाहीर केल्याप्रमाणे, केदारनाथ धामचे दरवाजे 2 मे रोजी सकाळी 7 वाजता भाविकांसाठी उघडले जातील आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडले जातील. ही यात्रा करू इच्छीणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने महत्वाची अपडेट आहे.

यात्रेमागे धारणा काय?

चार धामचे दर्शन घेतल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात. असा साधारण समज आहे. यामुळे, व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होते, म्हणजेच, व्यक्तीला पुन्हा नश्वर जगात जन्म घ्यावा लागत नाही आणि त्याला मोक्ष मिळतो. यासोबतच, हा प्रवास व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासातही मदत करतो. धार्मिक मान्यतेनुसार, बद्रीनाथ धामला विश्वाचे आठवे वैकुंठ असेही म्हटले जाते. भगवान विष्णू येथे सहा महिने विश्रांती घेण्यासाठी येतात. तसेच भगवान शंकर केदारनाथ धाममध्ये विश्रांती घेतात.

चार धाम यात्रा सामान्यतः यमुनोत्रीपासून सुरू होते आणि बद्रीनाथ येथे संपते, जी पश्चिम ते पूर्व दिशेने प्रवास करते. ही सर्व तीर्थक्षेत्रे देशाच्या विविध भागात आहेत. या धामांमध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, पुरी (जगन्नाथ), द्वारका आणि रामेश्वरम यांचा समावेश आहे. अशा या प्रसिद्ध चारधाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरूवात होत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News