जास्वंदीचे फूल केवळ सुंदरच दिसत नाही तर ते त्वचा आणि केसांचा रंग वाढवण्यासाठी देखील वापरले जाते. जास्वंदीच्या फुलांमध्ये लपलेले पोषक घटक केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदातही जास्वंदी केसांसाठी उत्कृष्ट मानली जाते. जास्वंदीच्या फुलांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, अमीनो अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. जर तुमचे केस पातळ असतील, त्यांची जाडी कमी होत असेल किंवा कोंड्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असेल, तर जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेले जास्वंदीचे हे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या फुलांपासून तयार केलेले तेल वापरल्यास केसांच्या मुळांना मजबूती मिळते. हे तेल बनवून साठवून देखील ठेवता देखील येते, त्यामुळे हे तेल केसांना दररोज लावल्यास केसांची गळती पूर्णपणे थांबते.
केसांच्या वाढीसाठी जास्वंदीचे तेल कसे बनवायचे
जास्वंदीचे तेल बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला शुद्ध नारळ तेलासह काही ताजी जास्वंदीची फुले आणि पाने आवश्यक आहेत. सर्वप्रथम, जास्वंदीचे तेल तयार करण्यासाठी 10-15 जास्वंदीचे फुले आणा सोबत जास्वंदीच्या झाडाची काही पाने देखील आणा, या पानांना आणि फुलांना चांगले स्वच्छ पाण्याने धुवून काढा, जास्वंदीची फुलं आणि पाने बारीक करा. नंतर एका कढईत खोबरेल तेल ओतून ही पाने आणि फुले टाकून मंद आचेवर तेलाचा रंग लाल होईपर्यंत शिजवा. तेल हलक्या लाल तांबूस रंगाचे झाले की ही कढई तशीच सुरक्षित ठिकाणी ठेवा. नंतर तेल थंड झाल्यावर गाळून ते एका काचेच्या बाटलीत भरुन ठेवा. हे तेल नियमित झोपताना मसाज करुन केसांच्या मुळांना लावा. आठवड्यातून किमान दोन वेळा हे तेल केसांच्या मुळांना नीट लावा. ज्यामुळे केस तुटणे थांबते आणि केसांची वाढ देखील होते. हे तेल केसांना खोलवर पोषण देते आणि कोरडेपणा देखील कमी करते.

केवळ जास्वंदीचे तेलच नाही तर त्याचा हेअर मास्क सुद्धा केसांना जाड आणि मजबूत बनवण्यास मदत करतो.
जास्वंदाचे हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत
केस सतत गळतीमुळे त्रस्त असलेल्यांसाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केसांच्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी, स्वस्त आणि प्रभावी अशा नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणे चांगले. जास्वंदाचे हेअर मास्क हे एक उत्कृष्ट उपाय आहे. जास्वंद हे केसांना मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच, ते केसगळती कमी करण्यास मदत करते आणि केसांची वाढ सुधारते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)