१८ दिवस अंतराळात घालवल्यानंतर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशू आणि इतर ४ जण स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानात होते आणि ते सर्वजण सुरक्षितपणे उतरले आहेत. हे अंतराळयान आज मंगळवारी (१५ जुलै) भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०१ वाजता कॅलिफोर्नियात उतरले. या पथकाने अंतराळात सुमारे ६० प्रयोग केले आहेत, अशी माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की शुभांशू शुक्लांना पूर्वी फुटबॉलमध्ये खूप ऋची होती.
सिटी मोंटेसरी स्कूलमधील शुभांशू शुक्ला यांच्या एका शिक्षकाने सांगितले की जेव्हा शुभांशू कॅलिफोर्नियाहून भारतात परतले तेव्हा संपूर्ण लखनौ त्यांच्या सन्मानार्थ मोठ्या संख्येने बाहेर पडले. ते म्हणाले, “शुभांशू शालेय जीवनात कमी अभ्यास करूनही चांगले गुण मिळवत असे. सर्वांनाच आश्चर्य वाटायचे की त्यांना इतके चांगले गुण कसे मिळतात. शुभांशू खेळांमध्ये, विशेषतः फुटबॉलमध्ये रस दाखवत असे. तो क्रिकेट देखील खेळायचा. जेव्हा शुभांशू एनडीएसाठी अर्ज करत होते तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही.”

शुभांशूचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला
शुभांशू शुक्लाचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनऊमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शुभांशू अंतराळवीर बनेल अशी फारशी आशा नव्हती, परंतु एका एअर शोमुळे त्यांना या क्षेत्रात रस निर्माण झाला. शुक्ला यांनी बालपणी एक एअर शो पाहिला होता, जिथे ते विमानाचा वेग आणि आवाज ऐकून रोमांचित झाले होते.
२००६ मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्ती
त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीसाठी अर्ज केला होता, परंतु वय जास्त असल्याने त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. २००६ मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्ती मिळाली आणि त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमटेक पदवी प्राप्त केली. त्यांना मिग-२९, डोर्नियर २२८ सारखी प्रगत लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे. २०१९ मध्ये त्यांची इस्रोच्या ‘इंडियन ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्राम’साठी निवड झाली. अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या चार उमेदवारांपैकी ते एक होते.