टेस्ला आणि विनफास्टची भारतात भव्य एन्ट्री: कोणत्या इलेक्ट्रिक कार लाँच होणार? किंमत किती असेल? जाणून घ्या

भारताच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) उद्योगाने आज म्हणजेच १५ जुलै २०२५ रोजी एक नवीन वळण घेतले आहे. कारण या दिवशी दोन दिग्गज कंपन्या – अमेरिकेची Tesla आणि व्हिएतनामची VinFast यांनी अधिकृतपणे भारतीय बाजारात प्रवेश केला. टेस्लाने मुंबईच्या BKC मध्ये आपला पहिला शोरूम आणि एक्सपीरियन्स सेंटर सुरू केला, तर विनफास्टनेही आपल्या इलेक्ट्रिक SUV मॉडेल्ससाठी बुकिंग सुरू केली आहे.

एलन मस्कसाठी भारत इतका महत्त्वाचा का?

Tesla चे CEO एलन मस्क यांच्यासाठी भारत हा केवळ एक बाजार नाही, तर एक रणनीतिक संधी आहे. युरोपमध्ये टेस्लाची विक्री सतत घसरत आहे आणि चिनी कंपन्या झपाट्याने पुढे जात आहेत. अशा परिस्थितीत, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल बाजार असलेला भारत एलन मस्कच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा ठरतो.

भारत सरकारची EV धोरण आणि टेस्लासाठी सवलती

पूर्वी भारतात पूर्णतः आयात (CBU – Completely Built Unit) करून आणलेल्या गाड्यांवर ११०% आयात शुल्क आकारले जात होते, जे टेस्लासारख्या परदेशी कंपन्यांसाठी मोठे आव्हान होते. मात्र, २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, ४०,००० डॉलर्सहून अधिक किंमतीच्या गाड्यांवर हे शुल्क ७०% पर्यंत कमी करण्यात आले आहे.

नव्या EV धोरणांतर्गत अतिरिक्त प्रोत्साहन

सरकारने आणखी काही अटींसह सवलती देण्याची घोषणा केली आहे. जर एखादी कंपनी पुढील ३ वर्षांत ४,१५० कोटींचा गुंतवणूक करते आणि ५ वर्षांत भारतात स्थानिक उत्पादन सुरू करते, तर त्या कंपनीला दरवर्षी ८,००० EV गाड्या आयात करण्याची परवानगी मिळेल. तसेच आयात शुल्कात १५% पर्यंत सवलत मिळू शकते.

Tesla ने मुंबईत उघडले पहिले शोरूम, VinFast चीही दमदार एन्ट्री

टेस्लाने भारतात आपल्या उपस्थितीला गती दिली असून, मुंबईच्या BKC परिसरात ४,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे आपले पहिले शोरूम आणि एक्सपीरियन्स सेंटर सुरू केले आहे. कंपनीच्या चीनमध्ये तयार झालेल्या पहिल्या लॉटमधील सुमारे ५ गाड्या भारतात दाखल झाल्या आहेत. टेस्लाने आपल्या Model Y आणि Model 3 या गाड्यांसाठी होमोलोगेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे. अंदाज आहे की, सर्वात आधी Model Y भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल.

Model Y ची वैशिष्ट्ये आणि संभाव्य किंमत:

ही मिड-साइज इलेक्ट्रिक SUV आहे.

एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे ५७४ किलोमीटरची रेंज देते.

संभाव्य किंमत: ₹६० ते ₹६५ लाखांच्या दरम्यान.

भविष्यात Model 3 आणि Model X देखील भारतात येऊ शकतात, जरी Model X ची किंमत खूप जास्त असेल.

VinFast ची भारतातील आक्रमक रणनीती

व्हिएतनाममधील VinFast कंपनीने भारतात स्थानिक असेंब्ली मॉडेलवर काम सुरू केले आहे, ज्यामुळे गाड्यांची किंमत स्पर्धात्मक ठेवता येणार आहे. कंपनीने २७ शहरांमध्ये ३२ शोरूम्स सुरू केले आहेत आणि तमिळनाडूमधील थूथुकुडी येथे ४०० एकर क्षेत्रफळावर प्रचंड प्लांट उभारला आहे.

या प्रकल्पात $२ अब्ज (सुमारे ₹१६,६२१ कोटी) गुंतवणूक करण्यात आली आहे.

पहिल्या वर्षी ५०,००० युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे.

पुढील ५ वर्षांत सुमारे ३,५०० रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची योजना आहे.

VinFast च्या इलेक्ट्रिक SUVs VF6 आणि VF7

VinFast ने भारतात लाँचपूर्वी आपली दोन्ही SUV मॉडेल्स – VF6 आणि VF7, दिल्ली, पुणे, चेन्नई, बेंगळुरु, हैदराबाद आणि लखनऊ येथील शॉपिंग मॉल्समध्ये प्रदर्शनासाठी ठेवली आहेत.

VF6:

लांबी: ४,२४१ मिमी

बॅटरी: ५९.६ kWh

रेंज: सुमारे ४८० किमी एका चार्जमध्ये

मोटर: २०१ hp पॉवर, ३१० Nm टॉर्क

व्हील्स: १७ व १९ इंच पर्याय

VF7:

लांबी: ४,५४५ मिमी (VF6 पेक्षा मोठी)

बॅटरी पर्याय: ५९.६kWh आणि ७०.८kWh

रेंज: सुमारे ४९८ किमी

फीचर्स: ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD), ८ एअरबॅग्स

संभाव्य किंमती:

VF6: ₹२५ ते ₹३० लाख

VF7: ₹४५ ते ₹५० लाख

या किंमतींच्या आधारे, VinFast आता Tata, Mahindra आणि MG Motors सारख्या भारतीय कंपन्यांना थेट टक्कर देण्याच्या स्थितीत आली आहे. भारताच्या EV बाजारात ही स्पर्धा ग्राहकांसाठी अधिक चांगले पर्याय आणि तांत्रिक प्रगती घेऊन येणार आहे.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News