114 वर्ष जगलेल्या फौजा सिंग यांच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट काय होतं? जाणून घ्या

‘टर्बनड टॉर्नाडो’ नावानं प्रसिद्ध असलेले जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झालं. सोमवारी (१४ जुलै) जालंधर-पठाणकोट महामार्गावर झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जालंधरमधील दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, जिथे त्यांचं निधन झालं. ११४ वर्षीय फौजा सिंग यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय होतं आणि धावण्यामुळे किती फायदा होतो हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
फौजा सिंग यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य

फौजा सिंग यांचा जन्म १ एप्रिल १९११ रोजी पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील बियास पिंड येथे झाला. बालपणी त्यांचे पाय खूप कमकुवत होते. त्यामुळे त्यांना 5 वर्षांचा होईपर्यंत चालता येत नव्हते. तरीही ते जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू बनले. त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य त्यांची सकारात्मक जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यात दडलेलं होतं.

फौजा सिंग यांचं शारीरिक आणि मानसिक बळ हेच त्यांच्या दीर्घायुष्याचा सर्वात मोठं रहस्य होतं. धावणं, ध्यानधारणा आणि संतुलित आहार हे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग होता. मानसिक ताण टाळण्यासाठी ते नेहमीच सकारात्मक रहायचे. फौजा सिंग यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीत त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं होतं. “मी नेहमीच आनंदी असतो. मी दररोज पंजाबी पिन्नी खातो. त्यानंतर मी कोमट पाणी पितो. मी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आणि प्रत्येक ऋतूत दही खातो”, असं सांगायचे. याशिवाय त्यांनी जंक फूड टाळण्याचा आणि नियमित चालण्याचा आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला.

धावण्यामुळे शरीराला किती फायदा होतो?

धावण्यामुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. फौजा सिंग यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांची पत्नी ज्ञान कौर आणि मुलगा कुलदीप यांच्या निधनानंतर ते नैराश्याने ग्रस्त होते. पण धावण्यामुळे ते केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही मजबूत राहिले.

धावणे हा हृदयरोगाचा व्यायाम आहे, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रित राहतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होते. नियमित धावण्यामुळे स्नायू मजबूत होतात. हाडांची घनता वाढते. तसेच ताण कमी होतो. धावण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया?

हृदयाचे आरोग्य: धावणे हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते आणि रक्ताभिसरण सुधारते. एका अभ्यासानुसार, आठवड्यातून १५० मिनिटे मध्यम गतीने धावल्याने हृदयरोगाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

मानसिक आरोग्य: धावण्यामुळे एंडोर्फिन हार्मोनचा स्राव वाढतो, ज्यामुळे ताण आणि नैराश्य कमी होते. स्वतः फौजा सिंग म्हणायचे की धावण्यामुळे त्यांना नैराश्यावर मात करण्यास मदत झाली.

हाडे आणि स्नायूंची ताकद:

नियमित धावण्यामुळे हाडांची घनता वाढते, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्या टाळता येतात.

रोगप्रतिकारक शक्ती: धावण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.

आयुष्य वाढते: एका संशोधनानुसार, नियमित व्यायाम करणारे लोक सामान्य लोकांपेक्षा ३ ते ७ वर्षे जास्त जगू शकतात.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News