भारताकडून लवकरच हल्ला होईल, पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांचा अंदाज

लवकरच भारताकडून आठवडा किंवा पंधरा दिवसातच हल्ला करण्यात येईल, असं पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी अंदाज वर्तवला आहे.

मुंबई – मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याची माहिती समोर येते. जी टीआरएफ दहशतवादी संघटना आहे ती पाकिस्तानशी संबंधित असल्याचे बोलले जाते. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर द्या, अशी तळागाळातील लोकांची भावना आहे. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल… जशास तसे उत्तर जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना दिला आहे. या सर्व घडामोडीनंतर लवकरच भारताकडून आठवडा किंवा पंधरा दिवसातच हल्ला करण्यात येईल, असं पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी अंदाज वर्तवला आहे.

यापूर्वी भारताकडून जशास तसे प्रतिउत्तर…

दरम्यान, भारताकडून एक आठवडा किंवा पंधरा दिवसातच हल्ला केला जाईल, पाकिस्तानमधील जे दहशतवादी ठिकाण आहेत. त्या ठिकाणी हल्ला करण्यात येईल तसेच यापूर्वी भारतावर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हाही भारताने याचे चोख प्रत्युत्तर दिले होते. 2016 मध्ये उरी आणि 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने याबद्दल हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊन बदला घेतला होता. आणि चोख प्रत्युत्तर दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती आताही होईल, भारत लवकरच पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढेल आणि त्यांचे समूळ उच्चाटन करेल. हेच आता भारतासमोरील मुख्य लक्ष असल्याचं पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी म्हटले आहे.

सिंधू जल करार रद्द…

दुसरीकडे पाकिस्तानकडून आणि भारताच्या सीमेकडून वारंवार आणि सातत्याने अतिरेकी हल्ले होत आहेत. हे हल्ले होत असताना आपण शांत कसे बसायचे, हल्ल्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी लोकांची भावना आहे. तर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीने 1960 रोजी सिंधू जल करार केला होता. तो करार पाकिस्तानसोबतचा रद्द करण्यात आला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानसोबत हा करार केला होता. परंतु पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि पाकिस्तानच्या सीमेकडून होणारे हल्ले हे लक्षात घेता हा सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. हा करार रद्द करण्यानंतर पाकिस्तानमधून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, याचे परिणाम पाकिस्तानमध्ये जाणवत आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News