देशभरात सध्याचे दर काय?
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोचा एलपीजी व्यावसायिक सिलेंडर आता 1665 रुपयांना उपलब्ध आहे, जो यापूर्वी 1723.50 रुपये होता. कोलकातामध्ये हाच सिलेंडर पूर्वी 1826 रुपये होता, परंतु आता त्याची किंमत 1768.5 रुपये झाली आहे. मुंबईत देखील दरात घट झाली असून, 1674.50 रुपयांचा सिलेंडर आता 1616 रुपयांना मिळत आहे. चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत पूर्वी 1881 रुपये होती, ती आता कमी होऊन 1822.5 रुपये झाली आहे.
घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे!
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जरी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल केले असले, तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. दिल्लीत 14 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत 853 रुपये इतकी आहे. कोलकातामध्ये याची किंमत 879 रुपये, मुंबईत 852.50 रुपये तर चेन्नईत 868.50 रुपये इतकी आहे. 8 एप्रिल 2025 रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती, त्यावेळी 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सध्या गृहिणींना कोणताही दिलासा मिळणार नाही.
