Mansoon Session – पावसाळी अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच विरोधकांनी राज्यातील महिला अत्याचार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्ज, कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या यावरून सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तर दुसरीकडे विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आणि शेतकरी अपमानस्पद वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केले होते. मात्र विरोधकांनी सभात्याग केला.
नाना पटोलेंचं एका दिवसांसाठी निलंबन…
दुसरीकडे विरोधक मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, यावर ठाम राहिले. यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाणे हे योग्य नाही, त्यामुळं नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र विरोधकांचा आणि नाना पटोले यांची घोषणाबाजी आणि त्यांचे वर्तन यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंचे एका दिवसासाठी निलंबन केले. यानंतर विरोधक अधिक आक्रमक होत घोषणाबाजी केली. या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय…माफी मागा…माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा…अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

माफी मागा… शेतकऱ्यांची माफी मागा
दरम्यान, विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी विरोधकांना जागेवरुन बसा…अशी विनंती केली. मात्र विरोधक आक्रमक झाले. आणि यावेळी काँग्रेस आमदार नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे वेलमध्ये गेले. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अध्यक्षांनी मला कारवाई करण्यास भाग पाडू नका. असं म्हटल्यानंतरही विरोधकांनी माफी मागा… माफी मागा…माफी मागा… शेतकऱ्यांची माफी मागा, अशी घोषणाबाजी केली. यावेळी सभागृहात गदारोळ पाहयला मिळाला.