मुंबई, पुण्यात जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली; देशभरात यंदा 106 % पावसाचा अंदाज

यंदा मे महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता. विदर्भ, मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.

जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायमच राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केली. देशात १०६% पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस शक्यता आहे.

मुंबई-पुण्यात पावसाने सरासरी ओलांडली!

यंदा मे महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता. विदर्भ, मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुणे आणि मुंबईतही पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली आहे. मुंबईत सरासरीच्या तुलनेत ४९.७ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये पुण्यात सरासरी १७३ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा २९ जूनपर्यंत २६३ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.

देशात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज

राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने मे महिन्यात व्यक्त केला होता. राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ५ जुलै नंतर राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. राज्याप्रमाणे देशांत जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असणार आहे.

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी

राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानूसार, जुलैच्या प्रारंभी काही भागांत दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 1 जुलैला पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण जून महिन्यात राज्यात पावसाच्या प्रमाणात मोठ्या तफावती पाहायला मिळाल्या. काही जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली, तर अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलैमध्ये मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्याची चिन्हे आहेत.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News