पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर, निवडणूक आयोगाचा निर्णय

आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. मतदार ओळखीकरिता व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट१२ पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Election Commission : देशातील पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकबाबत एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान, गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे येथील जागा रिकामी झाल्या आहेत. त्यामुळे या रिक्त जागी पोटनिवडणुक होणार आहे.

कोणत्या जागी होणार पोटनिवडणुक?

– गुजरात : (१) कडी (अनुसूचित जाती) कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे… (२) विसावदर: भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांच्या राजीनाम्यामुळे…
– केरळ : (३) निलांबूर: श्री. पी. व्ही. अनवर यांच्या राजीनाम्यामुळे…
– पंजाब : (४) लुधियाना वेस्ट: गुरप्रीत बसी गोगी यांच्या निधनामुळे आणि…
– पश्चिम बंगाल: (५) कालिगंज: नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक कसे?

अधिसूचना जारी होण्याची तारीख २६ मे २०२५; नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख २ जून २०२५; नामनिर्देशन छाननी ३ जून २०२५; उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून २०२५; मतदान १९ जून २०२५ आणि मतमोजणी २३ जून २०२५ रोजी होऊन निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ अशी आहे. दरम्यान, सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी १२ पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील.


About Author

Astha Sutar

Other Latest News