दोन्ही इंजिनं अचानक बंद झाल्यामुळे अहमदाबाद विमान दुर्घटना, 15 पानांच्या तपास अहवालात आणखी काय?

विमानानं उड्डाण केल्यानंतर दोन्ही पायलटमधील संवाद समोर आला आहे. त्यात एका पायलटने दुसऱ्याला तू दुसरं इंजिन बंद का केलं असा प्रश्न केला होता.

अहमदाबाद- महिनाभरापूर्वी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलाय. 15 पानांचा हा अहवाल 12 जुलैला सार्वजनिक करण्यात आला. प्रारंभिक तपासात दोन्ही इंजिन अचानक बंद झाल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.

टेकऑफ केल्यानंतर विमानातील दोन्ही इंधनाचे स्विच एकापाठोपाठ बंद झाले. त्यामुळे दोन्हाी इंजिनही बंद पडली. या काळात कॉकपिटमध्ये पायलटांमधील एकमेकांशी झालेला संवादही समोर आला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे झाला अपघात?

12 जून 2025 रोजी अहमदाबादहून इंग्लंडला जाणारं एयर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही वेळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळलं होतं. या अपघातात 270 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात विमानातील 241 प्रवाशी आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता.

विमानानं उड्डाण केल्यानंतर दोन्ही पायलटमधील संवाद समोर आला आहे. त्यात एका पायलटने दुसऱ्याला तू दुसरं इंजिन बंद का केलं असा प्रश्न केला. त्यावर दुसऱ्या पायलटनं आपण काहीही केलेलं नाही असं उत्तर दिलं. यानंततरचं संभाषण बाहेर येऊ शकलेलं नाही. या सगळ्यावरुन तांत्रिक कारणामुळेच विमानाचा अपघात झाल्याचा संशय आता बळावला आहे.

प्रयत्नानंतरही पायलट विमान कोसळणं वाचवू शकला नाही

ज्या वेळी दुर्घटना घडली त्या आधी विमानाचे दोन्ही इंधनाचे स्विच बंद होते. हे लक्षात आल्यानंतर पायलटनं हे दोन्ही स्विच सुरु केले. दोन्ही इंजिन पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यावेळी विमान फार कमी उंचीवर उडत होतं. त्यामुळे इंजिनांना पुन्हा गती प्राप्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे विमान कोसळलं. मात्र या सगळअयात इंधनाचे स्वीच बंद कसे झाले, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

30 सेंकदचं उडालं विमान

15 पानांच्या या अहवालात टेकऑफ पासून दुर्घटना घडेपर्यंत विमान केवळ 30 सेंकदचं हवेत उडालं. या अहवालात आत्तापर्यंत तरी इंजिनच्या ऑपरेटरसंबंधात काही इशारा किंवा कारवाईचा उल्लेख नाहीये. यासोबतच हवामान चांगलं होतं. बर्ड हिट किंवा घातपाताचा काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. आता या अहवालानंतर काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News