भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने ग्रँड शतरंज टूर रॅपिड 2025 च्या जाग्रेब फेरीत मोठा पराक्रम गाजवत जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन याचा सहाव्या फेरीत काळ्या मोहऱ्यांनी पराभव केला. या शानदार विजयामुळे गुकेश 12 पैकी 10 गुणांसह स्पर्धेत आघाडीवर आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीनपैकी दोन सामने जिंकलेल्या गुकेशने चौथ्या आणि पाचव्या फेरीत अनुक्रमे उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना यांचा पराभव केला. कार्लसनविरुद्धची ही गुकेशची सलग दुसरी विजय आहे. गेल्या महिन्यातही नार्वे शतरंज स्पर्धेत गुकेशने कार्लसनला हरवले होते.

गुकेशची सुरुवात मात्र काहीशी संमिश्र झाली होती. पहिल्या फेरीत त्याला पोलंडच्या जान-क्रिस्टोफ डुडाकडून 59 चालींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतु, त्यानंतर त्याने अप्रतिम पुनरागमन करत फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजा आणि भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद यांच्यावर मात केली.
ही गुकेशची स्पर्धेतील सलग पाचवी विजय ठरली असून, आता त्याच्या खात्यात 12 पैकी 10 गुण जमा झाले आहेत. अजून तीन फेऱ्या बाकी असताना, गुकेशने पोलंडच्या डुडा जान क्रिस्टोफवर दोन गुणांची आघाडी मिळवली आहे.
स्पर्धेतील स्थिती (रॅपिड फेरीअखेर):
1) डी. गुकेश – 10 गुण
2) जान-क्रिस्टोफ डुडा – 8 गुण
3) वेसली सो (अमेरिका) – 7 गुण
4) मॅग्नस कार्लसन (नॉर्वे), अनीश गिरी (नेदरलँड), इव्हान सारिच (क्रोएशिया) – 6 गुण
7) आर. प्रज्ञानंद (भारत), फॅबियानो कारुआना (अमेरिका) – 5 गुण
9) अलीरेझा फिरोजा (फ्रान्स) – 4 गुण
10) नोदिरबेक अब्दुसत्तारोव (उझबेकिस्तान) – 3 गुण
आणखी रोमांचक खेळाची अपेक्षा
भारतीय बुद्धिबळात तेजीने उदयास येणारा गुकेश आता जागतिक स्तरावर आपली छाप सोडताना दिसत आहे. आगामी फेऱ्यांमध्ये त्याच्याकडून आणखी रोमांचक खेळाची अपेक्षा आहे.